घरमहाराष्ट्रसमाजकल्याण विभागाने दिलेले कर्जमाफीचे एक हजार कोटी गेले कुठे?

समाजकल्याण विभागाने दिलेले कर्जमाफीचे एक हजार कोटी गेले कुठे?

Subscribe

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समाज कल्याण खात्याकडील एक हजार कोटींचा निधी घेतला होता. हा निधी घेताना मुख्यमंत्र्यांनी तो केवळ मागास शेतकऱ्यांनाच दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र हा निधी मागास शेतकऱ्यांना वितरीत झालाच नाही.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीत समाजकल्याण खात्याकडून घेण्यात आलेले एक हजार कोटी रुपये नक्की कोणाला वितरीत झाले, असा प्रश्न या विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे. या खात्याकडून आलेली रक्कम मागासवर्गीय शेतकऱ्यांना वितरीत करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांना दिला होता. मात्र हा निधी मागास गटातील शेतकऱ्यांना वितरीतच झाला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. यामुळे हा निधी गेला कुठे असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या वर्षी २४ जून २०१७ रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. ही कर्जमाफी करताना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागणीपत्रात अनेक क्लिष्ट बाबी विचारण्यात आल्याने मोठ्या संख्येने शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले.ऑनलाईन अर्ज करण्याच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत अर्ज भरणे अवघड गेले झाले होते. ज्यांना कर्ज मिळण्याची अपेक्षा होती, अशा शेतकऱ्यांना ते मिळालेच नाही. मुदतीत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. ही कर्मजाफी १४ हजार कोटींमध्येच संपल्याने सरकारवर जोरदार टीका झाली होती.

निधी मागास शेतकऱ्यांना वितरीत झालाच नाही

- Advertisement -

यात आता नवा वाद उभा राहिला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समाज कल्याण खात्याकडील एक हजार कोटींचा निधी घेतला होता. हा निधी घेताना मुख्यमंत्र्यांनी तो केवळ मागास शेतकऱ्यांनाच दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र हा निधी मागास शेतकऱ्यांना वितरीत झाला नाही, असे या खात्यातील एका अधिकाऱ्याने ‘महानगर’ला सांगितले. उपलब्ध माहितीनुसार राज्यात शेतीत काम करणाऱ्या मागासांमध्ये ९० टक्के हे भूमीहीन असून, ते शेतमजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समाजकल्याण खात्याकडे उपलब्ध झाली आहे. उरलेले १० टक्के हे अल्पभूधारक असल्याने त्यांच्याकडे शेती असण्याचा प्रश्नच नाही.

मंत्री राजकुमार बडोलेंचे उत्तर

- Advertisement -

अशा परिस्थितीत हा निधी कोणाला वितरीत झाला, अशी विचारणा खात्यातले अधिकारी आता विचारू लागले आहेत.या खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे विचारणा करता त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अपेक्षित मदत करणे हे प्रत्येक विभागाचे कर्तव्य होते. त्यानुसार आमच्या खात्याने एक हजार कोटींचा निधी कर्जमाफीसाठी दिला. हा निधी शेतकऱ्यांसाठी वितरीत झाला हेच यातील सत्य असल्याचे बडोले म्हणाले.

keys- loan wavers, social welfare department,social welfare, loan Approved by social welfare department,कर्जमाफी, समाजकल्याण विभागाने मंजूर केलेले कर्ज,समाज कल्याण, समाज कल्याण विभाग,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -