घरठाणेराज्यात आज कुठे पडणार पाऊस? 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

राज्यात आज कुठे पडणार पाऊस? ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Subscribe

मुंबई। राज्यात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. यामुळे राज्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  राज्यातील कोकणासह, रत्नागिरी, पालघर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे तर रायगड आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच जालना जिल्ह्यात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबईसह ठाणे परिसरातही मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यानुसार, मुंबई दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे मुंबईच्या काही सखल भागात पाणी साचले असून मुंबईतील अंधेरी सबवे पाण्या खाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच वसई-विरारमध्ये पावसाचा जोर कायम असून नालासोपाऱ्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमध्ये पाऊस नव्हता. पण आज नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वर्धा देखील पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणाच्या पाणी पातळी देखील वाढ झाली असून या धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. यातून 300 घन मीटर प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -