घरमहाराष्ट्रबीएमसीत पालकमंत्र्यांना केबिन कशाला? आदित्य ठाकरेंचा सवाल

बीएमसीत पालकमंत्र्यांना केबिन कशाला? आदित्य ठाकरेंचा सवाल

Subscribe

मुंबई | बीएमसीत पालकमंत्र्यांना केबिन कशाला?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना बीएमसीमध्ये केबिन दिले आहे. या मुद्यावर आदित्य ठाकरेंनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. ’24 तासांमध्ये केबिन रिकामी केली नाही तर मुंबईकर राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

 

- Advertisement -

गेल्या महिन्यांपासून बीएमसीमध्ये सर्व पक्षीय कार्यालये आणि समिती कार्यालय बंद असे असून देखील मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना बीएमसीमध्ये केबिन दिले आहे. बीएमसीमध्ये लोढांच्या केबिनला नागरिक कक्ष अशी पाटी लावण्यात आली असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे केबिन दिल्याची चर्चा आहे. बीएमसीतील सर्व पक्षीय कार्यालये बंद असताना पालकमंत्र्यांना केबिन का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

मुंबईकर राग दाखवतील 

आदित्य ठाकेर म्हणाले, “मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरला केबिन द्यावे आणि मुंबईच्या आमदाराना बीएमसीमध्ये केबिन दिली पाहिजे. मंत्रालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात पालमंत्री नाही तर भाजपचे माजी नगरसेवक जाऊन बसले होते. बीएमसीमध्ये राजकीय पक्षांनी कार्यलय बंद ठेवली. आता हुकूमशाही पद्धतीने खुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर हुकूमशाही गाजाविण्याचा प्रयत्न करत आहेत. जर हे 24 तासांमध्ये केबिन रिकामी केली नाही तर मुंबईकर राग दाखवतील,” असा धमकी वजा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -