घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : BMC वरील प्रशासक बेलगाम; 'त्या' जाहिरातीचा मुद्दा उपस्थित करत...

Winter Session : BMC वरील प्रशासक बेलगाम; ‘त्या’ जाहिरातीचा मुद्दा उपस्थित करत अनिल परबांचे आरोप

Subscribe

मुंबई : गेल्या काही काळापासून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पार पडली नसल्यामुळे त्याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी असलेलं प्रशासक बेलगाम झालं आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज विधान परिषदेत केला. (Winter Session Administrator on BMC Unbridled Anil Parab allegations raising the issue of BMC advertisement)

हेही वाचा – Winter Session : लोकसभेतील घटनेनंतर नागपूर विधान भवनाच्या सुरक्षेत वाढ

- Advertisement -

अनिल परब म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या असलेलं प्रशासक बेलगाम झालं आहे. नियम, कायदे मानण्याच्या ते मनस्थितीत नाही आहेत. त्यांना असं वाटंत की, ‘हम करे सो कायदा’. मुंबई महानगरपालिकेत सहायुक्त आयुक्त पदांची भरती होणार होती. ही भरती एनपीएससीच्या माध्यमातून केली जाते. एनपीएससीने मुलखती घेतल्या आहेत, परंतु अद्याप यादी आलेली नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तात्पुरती सहाय्यक आयुक्तांच्या पदासंदर्भात जाहिरात काढली. या जाहिरातीमध्ये निकष असे होते की, जो कार्यकारी अभियंता असेल त्याने किमान तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला पाहिजे. परंतु ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली ते, सहाय्यक अभियंते होते. सहाय्यक अभियंतांना प्रमोशन देऊन कार्यकारी अभियंता करण्यात आलं आणि कार्यकारी अभियंता झाल्यावर त्यांच्याकडे लगेच सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची जाहिरातीनुसार तीन वर्षांचा निकष पूर्ण केला पाहिजे. परंतु त्याठिकाणी किमान 100 लोक असे आहेत, ज्यांनी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला आहे. त्यात तीन लोक कोणाचे लाडके आहेत. ते तुमचे जावाई आहेत, तुमचे नातेवाईक आहेत की, त्यांनी तुम्हाला मोठी धनलक्ष्मी दाखवली आहे. फक्त या तीन लोकांना सहाय्यक अभियंतापासून कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंतापासून ताबडतोब सहाय्यक आयुक्त पदावर बसवण्यात आलं. ही नेमणूक तात्पुरती आहे, पण तात्पुरती करताना देखील सर्व निकष डावळले गेले आहेत.

- Advertisement -

 हेही वाचा – Winter Session : लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही; विरोधकांकडून राजकारण तर, सरकार म्हणते…

जयदीप मोरे, उद्धव बापू चंदनशिवे, समीर कृष्णाजी तळेकर आणि अजय रामभाऊ पाटणे असे जवळपास 32 लोक तिकडे आहेत, ज्यांना प्रमोशन दिले गेले आहे. तिथे एवढे पात्र लोक असताना फक्त तीन लोकांनाच सहाय्यक अभियंतावरून कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंतावरून सहाय्यक आयुक्त करण्यात आलं. परंतु त्या तीन लोकांनी तुमच्या जाहिरातीमधील निकषानुसार कुठलेही निकष पूर्ण केलेले नाहीत. या तीन लोकांना तात्पुरते प्रमोशन दिले असले तरी चुकीच्या पद्धतीने दिले आहे. त्यामुळे त्या तीन लोकांना पुन्हा मूळ पदावरती नेणार का? आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रमोशन दिलं त्यांच्यावर कारवाई करणार का?, असे प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले.

अनिल परब यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 37 सहाय्यक आयुक्तांची पद आहेत. यातील भरलेली 17 आहेत आणि 20 रिक्त आहेत. एनपीएससीकडून सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत, पण शिफारस पत्र न मिळाल्यामुळे नियुक्ता झालेल्या नाही आहेत, ही माहिती अनिल परब यांनी सांगितलेली खरी आहे. आपल्या 26 वॉर्डपैकी 14 ठिकाणी सहाय्यक आयुक्त हे नियमित आहेत आणि 12 ठिकाणी चार्ज देण्यात आलेला आहे. 12 ठिकाणी चार्ज देत असताना सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेला आहे आणि 10 ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना चार्ज देण्यात आलेला आहे.

हेही वाचा – Maratha Reservation: मराठा समाजाच्या विरोधातील पत्रात ‘या’ तीन आमदारांची नावे; मात्र आरक्षणाला पाठिंबा

यानंतर शासनाची बाजू मांडताना उदय सामंत म्हणाले की, कोणालाही आऊटऑफ दे वे जाऊन प्रमोशन दिले असेल तर आम्ही तपासून घेऊ आणि एमपीएससीला देखील विनंती करू, कारण न्यायप्रविष्ठ बाब असल्यामुळे एसपीएससी सांगत नसेल. परंतु एमपीएससीच्या आयुक्तांना सांगून विनंती करून की, लवकरात लवकर शिफारस पत्र आम्हाला द्यावीत, जेणेकरून त्याठिकाणी एमपीएससी लोकांच्या नियुक्त्या करू आणि तीन नाव अनिल परब यांनी सांगितलेली आहेत, ती तपासून नक्की बघू, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिली. मात्र उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. अनिल परब यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली तर सचिन अहिर हेही त्यांच्या बाजूने बोलताना दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -