घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अल्पकालीन चर्चेत वडेट्टीवारांची मागणी

Winter Session : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अल्पकालीन चर्चेत वडेट्टीवारांची मागणी

Subscribe

नागपूर : दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभाव, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, चाळीस दुष्काळी तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसूली मंडळांना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज बील माफ करावे, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, पिकविम्याची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान विधानसभेत केली. (Winter Session: Drought should be declared in state, Vijay Wadettiwar’s demand to government)

हेही वाचा – Winter Session : शिक्षक भरतीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरले

- Advertisement -

अल्पकालीन चर्चेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने ट्रीगर एकमध्ये 194 तालुके असताना केवळ 40 तालुकेच दुष्काळी घोषित केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांच्या अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले आहेत. तरी सरकारला लाज वाटत नाही. शासनाकडून तुटपुंजी मदत अपेक्षित नाही. सरसकट हेक्टरी किमान 50 हजार रूपये आणि बागायतीखालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान 1 लाख रूपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे. 24 ऑगस्टला आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. त्यानंतरही वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते, असेही वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, देशातील जवळपास 37 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. राज्यात सुमारे 3 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकार गंभीर नाही. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यापैकी मराठवाड्यात दररोज 2-3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. संकटात शेतकरी होरपळला असताना तुम्ही नियम, निकष, जीआरची भाषा करता. जीआर, नियम, निकष शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत असतील तर बदलले पाहिजेत, असा हल्लाबोलही यावेळी विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -