घरमहाराष्ट्रWomen Budget 2022: भारतीय महिलांना या बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

Women Budget 2022: भारतीय महिलांना या बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

Subscribe

कोरोना महामारीमुळे देशाची कोसळलेली आर्थिक व्यवस्था हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. पण यादरम्यान, भारतीय नोकरदार महिला आणि गृहिणी यांना मात्र यासर्व परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप २०२१ रिपोर्टमध्येही याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे २०२२-२३ च्या बजेटकडून भारतीय महिलांना विशेष अपेक्षा आहेत.

१. महिला शिक्षणावर भर-भारतात साक्षरतेचा दर ७७.७० टक्के आहे. यात पुरुष साक्षरता ८४.७० टक्के असून महिला साक्षरतेचे प्रमाण ७०.३० टक्के आहे. यामुळे या दोघांमधील साक्षरते मधील ही दरी भरुन काढण्यासाठी महिला व मुलींसाठी शिक्षणात विशेष तरतूद करण्याची मागणी महिला करत आहेत.

- Advertisement -

२.बचतीसाठी महिलांना विशेष सवलती-कलम ८० क च्या प्रावधानानुसार करदात्याच्या एकूण उत्त्पनावर जास्तीत जास्त १.५० लाख रुपयाची वजावट होऊ शकते. त्याचा महिलांना लाभ होऊ शकतो तसेच त्यांना अधिकाधिक बचत करणे शक्य होऊ शकते. त्याचबरोबर यामुळे कुटुंबात महिलांना नोकरी करण्याचीही परवानगी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे महिलांनी म्हटले आहे.

३. सरकारी नोकरीत जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य –अनेक खासगी क्षेत्रांमध्ये महिलांना ठराविकच विभागात काम करण्याची मुभा असते. पण सरकारी विभागात मात्र महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. यामुळे प्रामुख्याने पोलीस, शासकिय किंवा न्यायालयात महिला रोजगाराच्या संधी वाढवता येऊ शकतात.

- Advertisement -

४..महिला शिक्षण-  एका सर्वेक्षणानुसार कोरोना आणि लॉकडाऊन काळात शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. यामुळे महिला सशक्तीकरण समितीने सरकारकडे गरीब कुटुंबातील मुलींच्या शाळा सोडण्याची दखल घेण्याची मागणी केली आहे. अशा गरीब विद्यार्थींनींना डिजिटल सुविधा देण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे.

५.  कोरोना काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण यादरम्यान सर्वाधिक वाढले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुली बाई, सुल्ली डील यासाऱख्या सायबर क्राईमही याकाळात वाढले आहेत. यामुळे महिलांवरील अशा सायबर अटॅकविरोधात कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांनी सज्ज अशी यंत्रणा राबवण्याची मागणी महिला करत असून त्यासाठी बजेटमध्ये सरकारने तरतूद करणे अपेक्षित आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -