घरताज्या घडामोडीCorona Update: मुंबईत आज १ हजारांपेक्षा कमी नवी रुग्ण नोंद, पण पुण्यात...

Corona Update: मुंबईत आज १ हजारांपेक्षा कमी नवी रुग्ण नोंद, पण पुण्यात ३,७६२ नव्या रुग्णांची वाढ

Subscribe

मुंबईकरांना दिलासा मात्र पुणेकरांची चिंता कायम

मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. आज दिवसभरात मुंबईत हजाराच्या खाली नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत नोंद झाली. त्यामुळे मुंबईकरांना हळूहळू दिलासा मिळताना दिसत आहे. परंतु पुण्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. कारण मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात ३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत ९६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ८३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ४६ हजार ५९०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला असून १० लाख १७ हजार २८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ९ हजार ९०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

पुण्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पुण्यात ३ हजार ७६२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ हजार ९५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ९ हजार ८३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १९ हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला असून १३ लाख ३१ हजार १६३ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यात ५६ हजार ८८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – कोरोनाचा ‘NeoCov’ हा नवा व्हेरिएंट धोकादायक आहे का ? जाणून घ्या…


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -