घरमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर

Subscribe

२५ हजार महिलांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचं पठण

दरवर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे सामुहिक पठण केले जाते. यंदाही ऋषीपंचमीनिमित्ती आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. ॐ नमस्ते गणपतये, मोरया-मोरयाच्या जयघोषाने महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पहाटे पाच वाजल्यापासून पारंपारिक वेशात महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरूवात केली. या सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये महिलाचा उत्साह देखील तेवढाच होता.

- Advertisement -

२५ हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरिता आपली उपस्थिती दर्शविली होती. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरूण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त हे अथर्वशीर्षाचे पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ३३वे वर्ष आहे. ३३ वर्षापुर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा याकरिता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरूवात केली. फक्त १०१ महिलांपासून सुरू झालेल्या उपक्रमात आज २५ हजाराहून अधिक महिलांनी आपला सहभाग दर्शवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -