घरमहाराष्ट्रपगार होत नसल्याने वैतागून 'त्याने' घेतला गळफास

पगार होत नसल्याने वैतागून ‘त्याने’ घेतला गळफास

Subscribe

काही वर्षांपासून पगार होत नसल्याने एका औषध कंपनीतील कामगाराने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी- चिंचवड येथे घडली आहे.

काही वर्षांपासून पगार होत नसल्याने एका औषध कंपनीतील कामगाराने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवार, १ फेब्रुवारी रोजी घडली आहे. रामदास उकिरडे असं ५१ वर्षीय आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असून ते पोटाच्या विकारानेदेखील त्रस्त होते, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामदास उकिरडे हे पिंपरी येथील एका शासकीय औषध कंपनीत कामाला होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांचा पगार होत नव्हता. त्यामुळे ते तणावाखाली होते. ते नेहमी पगराविषयी घरच्या व्यक्तीशी चर्चा करायचे.

आजारानेही त्रस्त होते

रामदास हे पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर चिंचवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी आत्महत्या करतो असं ते नेहमी कुटुंबातील सदस्यांना म्हणायचे. त्यांची पत्नीचे ब्युटी पार्लर आहे. त्या शुक्रवारी दुपारी दुकानात जात असताना रामदास यांनी घराचा दरवाजा बाहेरून लावण्यास सांगितला होता. ‘मी आत झोपतो’, असं पत्नीला रामदास म्हणाले होते. परंतू पत्नी दुकानातून घरी परतल्यानंतर रामदास यांनी राहत्या घरात साडीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनासआले. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -