घरमहाराष्ट्रमोबाईलचे आकर्षण पडले महागात

मोबाईलचे आकर्षण पडले महागात

Subscribe

मोबाईलच्या आकर्षणामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या - येणाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणांकडून १९ मोबाईल जप्त केले आहेत.

मोबाईलच्या आकर्षणामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या – येणाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडिसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आरोपी रस्त्यावरु चालणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावत पळ काढायचे. या आरोपींना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे ते चोरी करायचे, असे त्यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले आहे. भोसरी येथे राहणारा सुनील प्रकाश यादव (१९) याच्या सह १५ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे राहणारे आरोपी सुनील यादव (१९) यांच्यासह १५ वर्षीय अल्पवयीन आरोपीला स्मार्ट फोनचे आकर्षण होते. यामुळे या तरुणांनी मोबाईल चोरी करण्याचा मार्ग अवलंबा. रस्त्यावर किंवा उद्यानात मोबाईलवर बोलत व्यस्त असलेल्या व्यक्तीचे मोबाईल हिसकावून दुचाकीवरुन धूम ठोकायचे. चोरलेले मोबाईल आरोपी हे घरात ठेवत होते. तसेच ते मित्रांना कमी किंमतीत विकत आणि मिळालेल्या पैशातून मौज मजा करायचे. केवळ मोबाईलच्या आकर्षणामुळे आत्तापर्यंत दोघांनी तब्बल १९ मोबाईल हिसकावले असून त्याची किंमत तब्बल ३ लाख १९ हजार एवढी आहे. हे सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

- Advertisement -

दरम्यान,सार्वजनिक रस्त्यावर किंवा उद्यानात मोबाईलवर बोलताना बेसावध राहू नये. तसेच निष्काळजीपणा करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले असून ज्यांचे मोबाईल हिसकावण्यात आले आहेत. अशा व्यक्तींनी एमआयडिसी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


वाचा – मोबाईल चोरी करणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -