घरमुंबईडहाणूत सात तासांत पाचवेळा भूकंप

डहाणूत सात तासांत पाचवेळा भूकंप

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून डहाणूत भूकंपाचे अधूनमधून हादरे बसत असताना आज पुन्हा एकदा सात तासात पाच भूकंपाचे हादरे बसल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून डहाणूत भूकंपाचे अधूनमधून हादरे बसत आहेत. या भूकंपाचा थरथराट कायम असून आज दिवभरात सात तासांमध्ये पाचवेळा भूकंप झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, अशी भिती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का हा ४.८ रिश्टर स्केलचा होता. या धक्क्यामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शाळा सोडण्यात आल्या असून या भूकंपाचे हादरे तलासरीपर्यंत जाणवल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

या ठिकाणी बसला भूकंपाचा फटका

डहाणू, तलासरी पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. आज सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी पहिला धक्का बसला होता. त्यानंतर सकाळी १०.०३ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तर १० वाजून २९ मिनिटांनी पुन्हा एकदा ३ रिश्टर स्केलचा हादरा जाणवला. तर दुपारी २ वाजून ५ मिनिटांनीही ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे भूकंपाचे धक्के धुंदलवाडी, चिंचले, पारडी, हळदपाडा, आंबोली, सासवद येथील घरांना मोठे तडे गेले असून या ठिकाणातील जिल्हा परिषदेच्या शाळा देखील सोडण्यात आल्या. तर या धक्क्याने अनेकांच्या घरातील भांडी देखील पडली. यामुळे डहाणूत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडी असल्याने स्थानिकांनी घरांना कुलूप लावून स्थलांतर केलं आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांची तंबूत सोय

सतत होणाऱ्या भूकंपामुळे डहाणूत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच धुंदलवाडीतील सरकारी आश्रमशाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळेबाहेर खास तंबू उभारुन सोय करण्यात आली आहे.


वाचा – डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -