घरमहाराष्ट्रदहावी, बारावीचा निकाल लॉकडाऊननंतर

दहावी, बारावीचा निकाल लॉकडाऊननंतर

Subscribe

बाधित क्षेत्रामध्ये परवानगी मिळवण्यात येत आहेत अडचणी

राज्य बोर्ड आणि शिक्षण विभागाकडून दहावी व बारावीचे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु बाधित क्षेत्रामध्ये पेपर तपासणीसाठी परवानगी मिळण्यात अडचणी येत आहेत. १०० टक्के पेपर तपासणी झाल्याशिवाय निकाल लावता येत नाही. त्यामुळे बाधित क्षेत्रामधील पेपर तपासणी शिल्लक राहिल्यास लॉकडाऊन उठल्यानंतरच दहावी, बारावीचा निकाल लागू शकतो, अशी माहिती शिक्षण विभागाचे आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

दहावी, बारावीची पेपर तपासणी होऊन निकाल वेळेत लावण्यात यावा यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सहज परवानगी मिळत आहे. मात्र रेड झोनमध्ये परवानगी मिळण्यास अडचणी येत आहेत. रेड झोनमधील बाधित क्षेत्रामध्ये फारच अडचणी येत आहेत. बाधित क्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी व आयुक्त परिस्थिती पाहून निर्णय घेत असतात. त्यामुळे येथे सार्वजनिक वाहतूक, प्रवासासाठी पास मिळत नसल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

राज्य बोर्डाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असले तरी बाधित क्षेत्रामधील पेपर तपासणी राहिल्यास निकाल लावता येणार नाही. सर्व ठिकाणचे निकाल एकाच वेळी लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे 100 टक्के काम पूर्ण झाल्यावरच निकालाची अंतिम तारीख जाहीर करता येत नाही. त्यामुळे बाधित क्षेत्रामधील पेपर तपासणी वेळेत झाल्यास निकाल लवकरात लवकर लावण्यात येईल, अन्यथा लॉकडाऊनपर्यंत आपल्याला थांबावे लागेल, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाकडून पेपर तपासणीसाठी शिक्षकांना परवानगी देण्यासाठी आपण विनंती केली आहे. परंतु काही ठिकाणी परवानगी मिळते तर काही ठिकाणी मिळत नाही. परंतु जिथे मिळत नाही तिथे आपल्याला लॉकडाऊनपर्यंत थांबावे लागेल.
– विशाल सोळंकी, आयुक्त, शिक्षण विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -