घरमहाराष्ट्रमरिन ड्राईव्ह येथे कारचा अपघात; एकाचा मृत्यू

मरिन ड्राईव्ह येथे कारचा अपघात; एकाचा मृत्यू

Subscribe

सोमवारी अंधेरी आणि मरिन ड्राईव्ह येथे अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई लॉकडाऊन असल्यामुळे सर्व रस्ते ओस पडले आहेत. याचाच फायदा वेगात गाडी चालवणारे शौकीन घेत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर वेगात गाडी चालवणं दोघांच्या जीवावर बेतलं आहे. मरिन ड्राईव्ह येथे सुसाट गाडी चालवत असताना सोमवारी संध्याकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

मारुती सीएट मोटार कार क्र.GJ-01- RP- 2512 या गाडीच्या मालकाने बी.डी.सोमाणी चौक, एन.एस.रोड, उत्तर वाहिनी, मरिन ड्राईव्ह येथे वेगात गाडी चालवत बस क्र. MH-04-FK- 2807 ला पाठीमागून धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, एकाचा जागीच मृत्यू झाला. आरेमन राजेश नागपाल (१८) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर शौर्यसिंग शरद जैन (१९) गंभार जखमी आहे. त्याला उपचारासाठी हरीकिशनदास हॉस्पिटलमध्ये नेले असून उपचार सुरु आहेत. दोघेही रा.ठी. रु.नं. १२२, तानिया हाईट, नेफेंसी रोड इथले रहिवासी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींच आर्थिक पॅकेज, लॉकडाऊन ४ची घोषणा!


दरम्यान, अंधेरी येथे मोठा अपघात झाला. गाडीने रस्त्याच्या कडेला गाडी ठोकली. दोन्ही अपघातातील मुलं ही मोठ्या घरातील होती. पूनम पांडे देखील मरीन ड्राईव्हर अशीच गाडी सुसाट पळवत होती. तिला पोलिसांनी पकडलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -