घरमुंबईमाहीममध्ये शाळकरी चिमुरडीचा विनयभंग, आरोपी गजाआड

माहीममध्ये शाळकरी चिमुरडीचा विनयभंग, आरोपी गजाआड

Subscribe

महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल असा प्रकार माहिम रेल्वेस्टेशनवर घडला आहे. गर्दीने गजबजलेल्या ठिकाणीदेखील महिला सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माहिम रेल्वेस्टेशनच्या रेल्वे पादचारी पुलावर उभ्या असलेल्या शाळकरी मुलीचा एका विकृत इसमाने विनयभंग केल्याचा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे पोलिसांनी त्या विकृत इसमाला बेड्या ठोकल्या आहेत. परमजीत सिंग (४७) असे या आरोपीचे नाव असून माहीम दर्ग्याजवळ रेती बंदर येथे फुटपाथवर तो राहतो. शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास मिनिटांनी पोलिसांनी परमजीतला अटक केली.

व्हिडिओ पहा

- Advertisement -

माहिम रेल्वेस्टेशनच्या पादचारी पुलावर दोन शाळकरी मुली बोलत उभ्या होत्या. त्यावेळी एका इसमाने यापैकी एका मुलीशी विकृत चाळे केले. या इसमाच्या हातात दोन बॅगा होत्या. मुलींपासून काही अंतरावर या बॅग्स ठेऊन तो त्यांच्या जवळ आला आणि एका मुलीला घाणेरड्या प्रकारे स्पर्श करून हा इसम परत मागे गेला. त्यानंतर दोन्ही बॅग्स हातात घेऊन काहीच घडले नाही, अशा आविर्भावात हा इसम तिथून निघून गेला. परंतु या सर्व प्रकारामुळे त्या मुली खूप घाबरल्या आहेत.

या मुली घरी गेल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या आईवडीलांना सांगितला. मुलींच्या पालकांनी त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -