घरमुंबईठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभाराचे १२ बळी, भाजपचा आरोप

ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभाराचे १२ बळी, भाजपचा आरोप

Subscribe

ठाकरे सरकार कोरोना हाताळण्यात संपूर्ण अपयशी ठरले

भांडूप येथील ड्रिम्स मॉलला गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग रात्रभर धुमसत राहिल्याने आगीच्या धुरामुळे मॉलमध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील कोविड रुग्णालयातील १२ रुग्ण दगावले आहेत. यावरुन विरोधी पक्ष भाजपने सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहे. ठाकरे सरकाच्या हलगर्जीमुळेच पुन्हा १२ बळी गेले आहेत. असा आरोप भाजपने केला आहे. या मॉलमध्ये रुग्णालय कोणत्याही अटींची पूर्तता न करता उभारण्यात आले होते. मॉलमध्ये अग्निसुरक्षा उपस्थित नसताना मॉलमध्ये रुग्णालय करण्याची परवानगी कशी देण्यात आली यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतांच्या कूटूंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर केली आहे.

भांडूप ड्रिम्स मॉलमधील आगीत रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. गेल्या काहि महिन्यांपूर्वी भंडाऱ्यातील रुग्णालयाच्या आगीमध्ये बालकांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात अद्यापही कोणतीह अग्निसुरक्षा यंत्रणा लावण्यात आली नाही.

- Advertisement -

भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले.

- Advertisement -

भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले.

रुग्णांची अक्षम्य हेळसांड सुरू असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांमध्ये होणारी वाढही धडकी भरवणारी आहे. देशातल्या नव्या रुग्णांपैकी सुमारे ६० टक्के महाराष्ट्रतले आहेत. ही नामुष्की आणणारं ठाकरे सरकार कोरोना हाताळण्यात संपूर्ण अपयशी ठरल्याचा आणखी काय पुरावा हवा? कोरोना महामारिच्या लढाईत महाविकास आघाडीला अपयश आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -