घरताज्या घडामोडीWest Bengal Assembly Election 2021: मतदानाच्या पहिल्याच टप्प्याला हिंसक वळण; भाजप कार्यकर्त्याची...

West Bengal Assembly Election 2021: मतदानाच्या पहिल्याच टप्प्याला हिंसक वळण; भाजप कार्यकर्त्याची हत्या!

Subscribe

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मतदानाला जबरदस्त उत्साह दिसत आहे. १.४५ मिनिटांपर्यंत ५४.९० टक्के मतदान झाले आहे. अजून देखील मतदान केंद्रांच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक उभे असून मतदान करण्यासाठी वाट पाहत आहेत. पण जरी असा जबरदस्त उत्साह दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला हिंसक प्रकार घडत आहेत. पूर्वी मेदिनीपुरमध्ये मतदानाच्या पूर्वी झालेल्या गोळीबारमध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले आहे. तर सालबोनीमध्ये सीपीएम उमेदवार सुशांत घोष यांच्यासोबत धक्काबुकी झाली. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला झाला आणि यांच्यामागे टीएमसी असल्याचा आरोप लावला आहे. शिवाय यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच सत्ताधारी पक्ष टीएमसीने (TMC – अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस) निवडणूक आयोगाच्या APPमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकारे आज मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात हिंसक वातावरणाने सुरुवात झाले दिसत आहे.

मेदिनीपुरमध्ये झाला गोळीबार

पश्चिम बंगालच्या पूर्वी मेदिनीपुरमध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी हल्ला झाला आहे. येथील भगवानपूर विधानसभा क्षेत्रातील सत्सतमलमध्ये गोळीबार दरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भाजपने टीएमसीवर आरोप केला आहे. जिल्हाध्यक्ष अनूप चक्रवर्ती म्हणाले की, ‘टीएमसीशी जोडलेले लोकं अरगोल पंचायत भागातील लोकांना धमकावत आहेत.’

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या गाडीला लावली आग

मतदानाच्या काही वेळापूर्वी पुरुलिया जिल्ह्यामध्ये बंदवानमध्ये मतदानाच्या वेळी वापरण्यात येत असलेल्या गाडीला आग लावली गेली. माहितीनुसार, मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांना सोडल्यानंतर गाडी परत जात होती. यादरम्यान राज्यातील नक्षलग्रस्त असलेल्या जंगलमहल क्षेत्रातील तुलसिडी गावात गाडीला आग लावली.

निवडणूक आयोगाच्या APPमध्ये गडबड

सत्ताधारी दल टीएमसीने निवडणूक आयोगाच्या APPमध्ये गडबड असल्याचा आरोप लावला आहे. यासंदर्भातील टीएमसी प्रतिनिधीनी निवडणूक आयुक्तांना तक्रार केली आहे. टीएमसी नेते डेरेक ओब्रियेन यांनी निवडणूक आयोगाला ई-मेल केला आहे की, ‘९ वाजून १३ मिनिटांनी कांथी दक्षिण आणि कांथी उत्तर जागवर मतदान अनुक्रमे १८.४७ ट्के आणि १८.९५ टक्के झाले होते. चार मिनिटानंतर ९ वाजून १७ मिनिटांनी मतदानाच्या संख्येत घट होऊन १०.६० टक्के आणि ९.४० टक्के झाली. अशा विसंगतीमुळे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह आहे’

- Advertisement -

सीपीएम उमेदवाऱ्यासोबत धक्काबुकी, ३ जणांना अटक

पश्चिम मेदिनीपुरच्या सालबोनीमध्ये सीपीएम उमेदावर सुशांत घोष यांच्यावर हल्ला झाला. एक व्यक्तीने सुशांत घोष यांच्यावर हल्ला केला. यावेळी परिस्थिती चिघळली आणि गर्दीत सीपीएम उमेदवाऱ्याच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी सुशांत घोष यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

सुवेंदु अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला

भाजप नेते आणि नंदीग्रामचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांचे भाऊ सुमेंदु अधिकारी यांनी आपल्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा केला. यामागे टीएमसी ब्लॉक प्रेजिडेंट राम गोविंद दास यांचा हात असल्याचा आरोप सुमेंदु अधिकारी यांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्याची हत्या

केशियारीमध्ये भाजप कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून हत्या केल्याचा दावा भाजपने केला आहे. कार्यकर्त्याच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचे भाजपने म्हटले आहे.


हेही वाचा – पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे वेळापत्रक मोदी, शहांनी दिले काय? ममता दीदींचा सवाल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -