घरमुंबईमुंबईकरांसाठी गारेगार प्रवासाकरता बेस्टमध्ये १२५० एसी बसेस

मुंबईकरांसाठी गारेगार प्रवासाकरता बेस्टमध्ये १२५० एसी बसेस

Subscribe

बेस्टने भाडे कपात करत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. बेस्टचा प्रवास स्वस्त केल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी लवकरच ५०० एसी मिनी, ५०० एसी मिडी आणि २५० एसी मिडी इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहेत. यासाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी बेस्ट मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी दिली.

बेस्टच्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी खासगी तत्वावर ४०० एसी मिनी बसेस बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वातर येणार आहेत. त्याच बरोबर या व्यतिरिक्त बेस्टमध्ये ५०० एसी मिनी, ५०० एसी मिडी आणि २५० एसी मिडी इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण 1250 बसेस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. सोबतच केंद्र सरकारच्या सबसिडीमधून ज्या ८० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १० बसेस लवकरच येणार असून त्या धारावी डेपोत उभ्या केल्या जाणार असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या बसेस लवकरच मुंबईकरांसाठी रस्त्यावर धावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय वन नेशन वन कॉर्डचा पायलेट प्रकल्प नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काही बसेसमध्ये राबविला जाणार आहे.

५०० एसी मिनी
५०० एसी मिडी
250 एसी मिडी इलेक्ट्रिक बसेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -