घरमुंबईकाळचौकीच्या महागणपतीच्या आगमनात देशभक्तीचा माहौल

काळचौकीच्या महागणपतीच्या आगमनात देशभक्तीचा माहौल

Subscribe

स्वतंत्रदिनी रंगणार आगमन सोहळा

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी मंडळांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून आगमन सोहळ्यात आपले वैशिष्ठ्य जपणार्‍या काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या मिरवणुकीच्या परंपरेला भारतीय परंपरेचा साज चढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपला आगमन सोहळा कसा वेगळा करता येईल, यासाठी उत्सव मंडळांमध्ये एकच स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, या स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून आपले वेगळेपण जपणार्‍या काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही एक वेगळे पाऊल टाकत आगमन सोहळा आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

यानुसार यंदा मंडळाने मिरवणुकीत भारतीय परंपरेला साजेसे अशा विविध रूपी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात मंडळाकडून भारतातील विविध देशांमधील परंपरा जपणारे नृत्य कला आणि इतर विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यासाठी काही इतर राज्यातील कलाकारांना देखील आमंत्रित करण्याचा मानस मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.यापूर्वी मंडळाने आपल्या आगमन सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपणारे लेझीम, कोळी नृत्य, भारुड, बाल्या डान्स यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आगमन सोहळ्यात आपले वैविध्यपूर्ण वेगळेपण जपले होते. त्याच अनुषंगाने मंडळाने यंदा राष्ट्रभक्तीची राष्ट्रीय हाक देत भारतीय परंपरेला साजेसे असे विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह अमन दळवी यांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली.

- Advertisement -

याबद्दल बोलताना अमन दळवी म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांनी आत्तापासूनच आपली तयारी सुरू केली आहे. काळाचौकी येथील महागणपती म्हणजेच काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा आयोजित केला आहे. हा आगमन सोहळा विशेष म्हणजे यंदा 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून या आगमन सोहळ्यात यंदा प्रथम भारतीय देशभक्तीचे जोड मिळणार आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला बरोबरच भारतीय परंपरेचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या आगमन सोहळ्यामध्ये ढोल-तशा पथक, पालखी सोहळा, लेझीम, रावण यांचा सहभाग असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -