घरमुंबई१९३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात

१९३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात

Subscribe

घड्याळ, फ्रिज, सिलेंडर, वॉशिंग मशिन, टीव्ही, नाटक, सिनेमांची तिकीटे होणार स्वस्त,निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे आगामी विधान सभा निवडणूक जड जाऊ नये म्हणून राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. १९८ वस्तूंवरी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात घड्याळ, फ्रिज, वॉशिंग मशीन घरगुती एलपीजी सिलेंडर यांसारख्या वस्तू आणि नाटक, सिनेमांचे तिकीट देखील स्वस्त होणार आहे. एकूण तीन टप्प्यांत वस्तूंचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

राज्य सरकारने जीएसटी कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २२८ पैकी १९३ वस्तुंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर आणखी कमी करण्यात आले आहेत. तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

ज्या वस्तूंचा कर दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका कमी करण्यात आला त्यात प्रामुख्याने प्लायवूड, विनीयर पॅनल्स, तत्सम लॅमिनेटेड लाकूड, स्टोव्ह ( केरोसीन व एलपीजी स्टोव्ह वगळता),हातातील घड्याळे,पॉकेट व इतर घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रिज, फ्रिझर, वॉटर कुलर, दुधाच्या कुलरसह रेफ्रिजरेटिंग किंवा अतिशीत उपकरणे, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लिनर, ६८ सें.मी पर्यंतचे दूरदर्शन संच, ३२ इंचापर्यंत स्क्रीन असलेले मॉनीटर, यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

पॅकेज केलेले पेयजल, कंडेन्सड मिल्क, शेतीच्या मशागतीसाठी, वनीकरणासाठी किंवा लागवडीसाठी लागणारे यंत्राचे भाग, तसेच लॉन किंवा स्पोर्टस ग्रांऊड रोलर्स, मुख्य कंत्राटदाराला उप कंत्राटदाराद्वारे प्रदान केलेल्या वर्क्स, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस यांचा कर दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. १८ आणि १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधे असलेल्या संगणक सॉफ्टवेअर, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी (सीडी रॉम),रेकॉर्ड केलेले मॅग्नेटिक टेप, मायक्रोफिल्मस, मायक्रोफिचेस, घरगुती वापरामध्ये येणारे एलपीजी, १००० रुपये प्रति जोडीपर्यंत किंमत असणारे पादत्राणे, यासारख्या वस्तूंचा जीएसटी ५ टक्के इतका करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोणत्याही भाषेतील नाट्य संगीत, नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, लोक किंवा शास्त्रीय कला यांसारख्या सर्व नाट्य सादरीकरणाच्या प्रवेशासाठीच्या तिकिटांच्या किंमतीवरील जीएसटी दर सूट मर्यादा २५० रुपयांवरून ५०० रुपये इतकी वाढवण्यात आली. १०० रुपयांपर्यंत किंमत असलेल्या सिनेमा तिकिटावरील कराचा दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के आणि १०० पेक्षा जास्त किंमत असलेल्या सिनेमा तिकिटाचा कर दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका कमी करण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -