घरमुंबईएकाच तिकिटावर करा रेल्वेचा देशभर प्रवास

एकाच तिकिटावर करा रेल्वेचा देशभर प्रवास

Subscribe

प्रतिष्ठित एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश

रेल्वेची एकच तिकीट काढून संपूर्ण देश फिरणे आता शक्य होणार आहे. भारतीय रेल्वेने फस्ट एसीची सर्क्युलर तिकीट सुरु केली होती. मात्र त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ही तिकीट बंदही करण्यात आली होती. मात्र आता ही सर्क्युलर तिकीट पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त प्रवाशांनी या तिकीटाकडे आकर्षित व्हावे म्हणून भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस यांसारख्या प्रतिष्ठित गाड्यांचा सर्क्युलर तिकीट प्रवासात समावेश केला आहे. विशेष म्हणजे या तिकीटाद्वारे प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरीक पुरुषांना 40 टक्के तर जेष्ठ नागरीक महिलांना 50 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. देशभरात रेल्वेद्वारे फिरायला सुविधा व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने एक सर्क्युलर प्रवास तिकिट सुरु केली होती.

- Advertisement -

मात्र या सर्क्युलर तिकीटातून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे सर्क्युलर प्रवास तिकीटांची विक्री होत नव्हती. त्यामुळे 1 जुलै 2017 मध्ये ही फस्ट एसीची सर्क्युलर तिकीट बंद करण्यात आली. मात्र आता भारतीय रेल्वेने या तिकिटाचा फायदा जास्तीतजास्त प्रवाशांनी घ्यावा म्हणून त्याबाबतच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. पूर्वी फक्त साध्या रेल्वे गाडयांसाठी या सर्क्युलर तिकीट होत्या. मात्र आता भारतीय रेल्वेच्या प्रतिष्ठित रेल्वे एक्स्प्रेसमधील प्रवासदेखील या सर्कुलर तिकिटाच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वे बॉर्डाने देशभरातील सर्व रेल्वे झोनल विभागांना पत्र पाठवले आहे.

काय आहेत सर्क्युलर प्रवास तिकीट ?
ही तिकीट रेल्वेने भारत फिरू इच्छिणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. या सर्क्युलर तिकीटांच्या माध्यमातून देशभरात कुठेही आणि कसाही प्रवास करू शकता येणार आहे. मात्र जेथून प्रवासाची सुरूवात करणार त्याच स्थानकावर तुम्हाला तुमचा प्रवास संपवावा लागणार आहे. या तिकीटाचा फायदा घेणार्‍यांना कमीतकमी एक हजार किलोमीटर प्रवास करणे गरजेचे आहे. प्रवास दूरचा असल्यास तब्बल आठ वेळा प्रवासी हॉल्ट जर्नी करू शकणार आहेत.

- Advertisement -

* प्रवाशांच्या पैशाची होणार बचत.
* प्रवासात वेळेची बचत होणार.
* एकदा तिकीट काढली की एक महिन्यापेक्षा जास्त प्रवास करू शकणार.
* आठ वेळा हॉल्ट जर्नी (प्रवास थांबवणे) घेऊ शकणार.
* एक हजार किमी प्रवास करणार्‍यांना 30 टक्के सूट
* प्रवास श्रेणी बदलून घेण्याची मुभा असणार आहे.
* विमा सुध्दा मिळणार
* प्रवाशांना टेलिस्कोपिक दराचा फायदा होणार.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -