घरमुंबईलोअर परळमध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दोन अपघात, १ ठार

लोअर परळमध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दोन अपघात, १ ठार

Subscribe

मुंबईच्या लोअर परळ उड्डाण पुलावर रविवारी एकाच ठिकाणी अवघ्या ५ मिनिटांच्या अंतराने २ अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अजब प्रकार म्हणजे मृत्यू झालेला युवक प्रत्यक्ष अपघातात न सापडता फक्त अपघात बघताना बाईकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघातग्रस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिल्या अपघाताचा तपास करण्यासाठी घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांच्या डोळ्यांदेखल युवकाचा अपघात झाल्यामुळे पोलिसांनाही काही काळ धक्का बसला.

रविवारी मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाली होती. शिवाय रस्ते देखील निसरडे झाल्यामुळे पोलिसांकडून वाहने सावकाश चालवण्याचं आवाहन केलं जात होतं. लोअर परळ उड्डाणपुलावर रविवारी संध्याकाळी दोन कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. यातल्या एका कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक ओलांडून ही कार दुसऱ्या बाजूला जाऊन समोरच्या कारला धडकली. या अपघाताचा धक्का इतका जोरात होता की समोरची कार थेट पुलाच्या बाजूला रेलिंगवर जाऊन अडकली. या अपघातात दोन्ही कारचालकांना किरकोळ जखम झाली.

- Advertisement -

लोअर परेलमध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दोन अपघात, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

लोअर परेलमध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दोन अपघात, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, July 5, 2020

मात्र, अवघ्या पाच मिनिटांत त्याच ठिकाणी याच अपघातामुळे दुसरा अपघात झाला. समोरून येणाऱ्या १८ वर्षीय बाईकस्वाराचं पुलावर झालेल्या दोन कारच्या अपघाताकडे लक्ष गेलं. हा अपघात पाहाण्याच्या नादात बाईकस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि तो दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या बाईकस्वाराला धडकला. या धक्क्यामुळे हा युवक थेट बाजूने जाणाऱ्या बेस्टच्या चाकाखाली आला.

- Advertisement -

जखमींना तातडीने घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बाईकस्वाराला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर संबंधित बेस्ट चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -