घरमुंबईयकृतावर केल्या तीन शस्त्रक्रिया; तरुणाचा वाचला जीव

यकृतावर केल्या तीन शस्त्रक्रिया; तरुणाचा वाचला जीव

Subscribe

अपघातामुळे गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तात्काळ उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

विरामधील २१ वर्षीय वेदांत फार्मासीच्या दुसऱ्या वर्षांला असून परीक्षा जवळ आल्यामुळे नोट्स आणि अभ्यासकामाच्या झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर पडला होता. दुचाकी ७० च्या वेगाने चालवत असताना अचानक त्याची बाईक एका खड्यात गेली. बाईक रस्त्यावरच आडवी झाली आणि वेदांत दुभाजकावर जाऊन आदळला. त्याला तात्काळ एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार केल्याने त्याचा जीव‌ वाचला आहे.

वेदांतच्या डोक्यावर  हेल्मेट असल्यामुळे त्याच्या डोक्याला मार बसला नव्हता. स्थानिकांनी तात्काळ त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.पण, त्याचा रक्तदाब कमी झाला आणि तो बेशुद्धावस्थेत गेला. त्यामुळे तातडीने त्याला मीरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल केलं गेलं. अपघातात वेदांतच्या पोटाला गंभीर मार बसला होता आणि त्याची चाचपणी करण्यासाठी सिटी स्कॅन करण्यात आले असता त्याच्या यकृताला गंभीर जखम झाल्याचे निदान झालं. यकृताला मार बसल्यामुळे भरपूर रक्तस्त्राव होत होता, अशामध्ये कोणतीही शस्त्रक्रिया करणं जोखमीचं होतं.‌

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे पोटातील आतड्यांचे – एचपीबी शल्य विशारद डॉ. इमरान शेख यांनी सांगितलं की, ” यकृताला मार बसल्यामुळे त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे आधी रक्तस्त्राव थांबवणं हे एक आव्हान होतं. हा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आम्ही ३ दिवस यकृतावर मॉप्स ठेवले आणि तीन दिवस कोणतीही शल्यचिकित्सा केली नाही. या तीन दिवसात त्याचं पोट खुलं होतं. रक्तस्त्राव थांबल्यावर यकृतावर शल्यचिकित्सा केली. यकृतावाटे रक्त गेल्यामुळे त्याचे रक्त पातळ झाले होते. त्यामुळे अशा रुग्णावर दुसरी शल्यचिकित्सा ही फारच वैद्यकीय क्षेत्रात फारच दुर्मिळ घटना मानली जाते.”

यकृतावर केल्या तीन शस्त्रक्रिया

यकृतात परत रक्तस्त्राव सुरु झाला तर अशावेळी त्याचा जीव वाचवणं अशक्य असते.
यकृताला रक्त पोहचवणाऱ्या असंख्य धमन्यांना कोणतीही इजा न करता यकृताला झालेल्या जखमांवर शल्यचिकित्सा केली गेली. ४ दिवसानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन यकृताची जखम भरून निघत होती. पुन्हा सिटी स्कॅन केल्यानंतर यकृताजवळील पित्तनलिका लीक झाल्याचे आढळून आले त्यावर लगेच लॅप्रोस्कॉपीक पद्धतीने तिसरी शल्यचिकीत्सा केली.

- Advertisement -

भारतात दिवसाला दोन हजार बाईकस्वारांचा मृत्यू

आजच्या घडीला भारतात रस्ते दुर्घटनांमध्ये रोज दोन हजार बाइकस्वारांचा अपघात होत असून अनेकवेळा गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो. तर अनेकजणांना कायमचं अंपगत्व येतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -