घरमुंबईउल्हासनगर मनपाच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

उल्हासनगर मनपाच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

Subscribe

मनसे विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर अध्यक्ष मनोज शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

उल्हासनगर महापालिकेतील शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार, बेकायदेशीर आणि असुरक्षित कोचिंग क्लासेस यासह शिक्षणासंबंधी इतर तक्रारींच्या निवारणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर अध्यक्ष मनोज शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी मनोज शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले. दरम्यान या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर महापालिकेला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती मनोज शेलार यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा – विविध विकासकामांसाठी १५२९ कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजूरी – मुख्यमंत्री

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या शाळांची दूरवस्था झाली असून या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जाते. शिक्षण मंडळात मनमानी कारभार सुरू असून बेकायदेशीर पदोन्नती दिली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर अध्यक्ष मनोज शेलार यांनी जिल्हाधिकारी आणि राज्यशासनाकडे केली आहे. यावेळी शहरातील बेकायदेशीर आणि असुरक्षित कोचिंग क्लासेस बाबत देखील मनोज शेलार यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -