घरमुंबई२३०० जणांचा परतावा अयशस्वी

२३०० जणांचा परतावा अयशस्वी

Subscribe

घराचे स्वप्न पूर्ण करण्यात नशीब आजमावलेल्या अर्जकर्त्यांच्या चुकांमुळे म्हाडाला अनामत रकमेचा परतावा करता आलेला नाही. मुंबई मंडळाच्या लॉटरी सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जकर्त्यांमध्ये २ हजार ३१५ जणांच्या अनामत रकमेेचा परतावा म्हाडाकडे अडकला आहे. अनेक कारणांमुळे म्हाडाच्या अर्जकर्त्यांचा परतावा बँक खात्यामध्ये पाठवण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळेच म्हाडाने अनामत रकमेचा परतावा न मिळालेल्या अर्जकर्त्यांना ही रक्कम घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत म्हाडाने १ लाख ६१ हजार ९४० जणांचा परतावा यशस्वीरीत्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केला आहे.

बँक खात्याचा तपशील चुकीचा असणे, खात्याचा तपशील न जुळणे, बँक खाते बंद असणे, पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी मंजुरी नसणे, चुकीचा आयएफएससी कोड, अकाऊंट ब्लॉक केलेले असणे, खात्यावरचे नाव न जुळणे, बँक खात्याचा तपशील न जुळणे, बँकेच्या खात्यावर व्यवहार झालेले नसणे, एनईएफटीचा पर्याय उपलब्ध नसणे यांंसारखी मुख्य कारणे परतावा पाठवण्यातील अडचणींमागील आहेत. परतावा न मिळणार्‍या अर्जदारांमध्ये सर्व आर्थिक श्रेणीतील अर्जकर्त्यांचा समावेश आहे. म्हाडाने २,३१५ जणांपैकी १,३०० अर्जकर्त्यांनी म्हाडाकडे रक्कम परत मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. तर, आणखी ११०० जणांचा परतावा म्हाडाकडे शिल्लक आहे.

- Advertisement -

कसा मिळेल परतावा
म्हाडाकडे अनामत रकमेचा परतावा मिळविण्यासाठी एक अर्ज म्हाडा उपमुख्य पणन अधिकार्‍यांचे नावे करणे गरजेचे आहे. त्यासोबतच एक कॅन्सल्ड चेक आणि आधारकार्डची छायांकित प्रत ओळखीचा पुरावा म्हणून जोडावी लागेल.

कुठे अर्ज करायचा
उपमुख्य अधिकारी पणन, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, कक्ष क्रमांक २४०, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथे अर्ज जमा करावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -