घरमुंबईतरीही मॅरेथॉनला खड्ड्यांचा सामना करावा लागलाच

तरीही मॅरेथॉनला खड्ड्यांचा सामना करावा लागलाच

Subscribe

9 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खड्डेमय रस्त्यातून होणार की काय अशी भीती ठाणेकर व्यक्त करत असतानाच महापौरांनी शहराचा पाहणी दौरा करून संबंधितांना तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते.

२९ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खड्डेमय रस्त्यातून होणार की काय अशी भीती ठाणेकर व्यक्त करत असतानाच महापौरांनी शहराचा पाहणी दौरा करून संबंधितांना तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. याची दखल घेत आयुक्तांनीही ठाणे मॅरेथॉन रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रात्रीचा खडा पहारा दिला. खड्डे बुजविण्याची कामे युध्दपातळीवर सुरु करण्यात आले. मॅरेथॉनपूर्वी रस्त्याची आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही देखील प्रशासनाने दिली. तरीही २९ व्या ठाणे मॅरेथॉनला खड्ड्यांचा सामना करावा लागलाच.

नगर अभियंता आणि सर्व अभियंत्यांची तातडीची बैठक घेवून रात्रीचा दिवस करून खड्डे भरण्याच्या सूचना ठामपा आयुक्तांनी दिल्या. त्याचबरोबर प्रभाग समितीनिहाय महत्वाची ठिकाणे निश्चित करून विविध पथके तयार करून खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दिवसा खड्डे भरताना वाहतुक कोंडी होत असल्याने रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. रात्रीच्या वेळी काम करताना कुठलाही त्रास होवू नये यासाठी अतिक्रमण विभागाकडे असलेले पोलिस कर्मचारी प्रत्येक पथकासोबत देण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: जातीने पहाटे ३ वाजेपर्यंत या कामाची पाहणी करत होते. तरीही मॅरेथॉनच्या स्पर्धकांना खड्ड्यांचा सामना करावा लागल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -