घरमुंबईतिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, लोकल सेवा उशीराने

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, लोकल सेवा उशीराने

Subscribe

मेगाब्लॉकमुळे तीन ही मार्गावरील रेल्वेसेवा १५ ते २० मिनिटं उशीराने धावेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

आज रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानका दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणआर आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानका दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि माहिम स्थानका दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे तीन ही मार्गावरील रेल्वेसेवा १५ ते २० मिनिटं उशीराने धावेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात लोकल गाड्या थांबतील. माटुंगानंतर पुन्हा अप धिम्या मार्गावर लोकल धावतील. मेगाब्लॉक दरम्यान, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

- Advertisement -

हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणआर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला – पनवेर मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या तिकीट-पासवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून सकाळी १० ते ६पर्यंत प्रवास करण्याची मुभा आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक काळामध्ये पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने धावतील.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -