घरमनोरंजनदीपिकाचं चाहत्यांना खास 'रिटर्न गिफ्ट'

दीपिकाचं चाहत्यांना खास ‘रिटर्न गिफ्ट’

Subscribe

दीपिका पदुकोण लवकरच अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत आपला पुढील चित्रपट करणार असल्याची चर्चा सध्या रंगते आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s presenting my website- www.deepikapadukone.com (link in bio) Love, Deepika

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या वेबसाईटवर जगभरातील लोकांना दीपिकाची बायोग्राफी, तिच्या व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स.. उदा. तिचे आगामी चित्रपट तसंच ती करत असलेले अन्य प्रोजेक्ट्स, याविषयीची माहिती मिळणार आहे. दीपिकाने आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची तपशीलवार माहिती या वेबसाईटवर आहे. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार काल दीपिकाने तिची वेबसाईट लाँच करताच त्यावर लोकांनी खूप जास्त प्रमाणात भेटी दिल्या आणि त्यामुळे लाँचिंगच्याच दिवशी वेबसाईट काही काळासाठी स्लो झाली होती. यावरुनच, दीपिकाच्या चाहत्यांची संख्या आणि त्यांच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाची प्रचिती येते.
दरम्यान, लग्नानंतर दीपिका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकळ्याच्या तयारीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत दीपिका आपला पुढील चित्रपट करते आहे. सध्या सर्वत्र जी चर्चा रंगते आहे त्यानुसार, दीपिका आणि विक्रांतच्या काम करणार असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘छपाक’ असं आहे. मात्र, याबद्दल दीपिकाकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. ‘पद्मावत’ चित्रपटानंतर दीपिकाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतुर असणार यात काहीच शंका नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -