घरCORONA UPDATEकल्याण डोंबिवलीत ३८० क्वारंटाईन;८ पैकी २ करोनाग्रस्तांना डिस्चार्ज 

कल्याण डोंबिवलीत ३८० क्वारंटाईन;८ पैकी २ करोनाग्रस्तांना डिस्चार्ज 

Subscribe

८ पैकी २ करोनाग्रस्तांना डिस्चार्ज 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ०८ कोरोना बाधीत रूग्णं  आढळून आले असून त्याापैकी ०२ रूग्‍णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. उर्वरीत सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यापैकी ०१ रूग्ण जसलोक हॉस्पीटलमध्ये तर उर्वरित सर्व रूग्णावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली, महापालिका क्षेत्रात  २८ मार्चला दोन नवीन रूग्णं आढळून आलेले असून, त्यांच्या ८ निकटवर्तीयांना कस्तुरबा येथे तपासणी करण्यात आली. त्यापैकी, ३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरीत ५ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांच्या  परिसर लॉकडाऊन करण्यात आला असून प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.

सध्या् महापालिका क्षेत्रात  ३८० होम क्वारंटाईन नागरीक असून महापालिकेमार्फत त्यांची दैनंदिन विचारपूस करण्यात येत आहे. तसेच, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम येथील एका रूग्णां चा अहवाल पॉझिटीव्ह आला असून या रूग्णालयाने खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असून अहवाल अद्याप अप्राप्त आहे. या रूग्णास मुंबई येथील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्याचे निकटवर्तीयांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच, जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील लग्न सोहळयास उपस्थित असणा-या नागरीकांना होम् क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिलेला असून  त्यांच्या घरी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.  नागरीकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीकरीता बाई रूक्मीणीबाई रूग्णालय, कल्यााण  येथील ०२५१-२३१०७०० व शास्त्रीनगर सामान्य रूग्णा‍लय, डोंबिवली येथील ०२५१-२४८१०७३ व ०२५१-२४९५३३८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -