घरUncategorizedCoronaVirus: अकोले तालुक्यात १२ हजार लोक होम क्वारंटाईन

CoronaVirus: अकोले तालुक्यात १२ हजार लोक होम क्वारंटाईन

Subscribe

अकोले तालुक्यातील ११ हजार ५८० नागरिकांना होम क्वारंटाईन

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदीवासी भाग म्हणून राज्यात परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील ११ हजार ५८० नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली आहे. नगरमध्ये तीन कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. रविवारी तीनपैकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. एकट्या अकोलेमध्ये सुमारे १२ हजार लोक प्रशासनाच्या देखरेखीखाली आहेत.

वैद्यकीय तपासणीनंतर केले होम क्वारंटाईन

आदिवासी अकोले तालुक्यात कोरोना रोगाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. मात्र अकोले तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा घराघरात पोहोचून नागरिकांची जनजागृती करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लॉकडाउनलादेखील अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना रोगाला तालुक्यातील कुणीही नागरिक बळी पडू नये, याची दक्षता प्रशासन अतिशय काटेकोरपणे घेत आहे. अकोले तालुक्यात कोरोनासदृश्य रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाने बाहेरून आलेल्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. पुणे, मुंबईसह इतर दुसऱ्या जिल्ह्यातून, राज्य व परदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून या सर्वांना चौदा दिवसांसाठी ‘होम क्वारंटाईन’ केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती अभियान सुरू आहे. नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, एकमेकांपासून ५ ते ६ मीटरचे अंतर ठेवावे. होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी कुणाच्याही संपर्कात जाऊ नये. अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.
-डॉ. इंद्रजीत गंभीरे, वैद्यकीय अधिकारी
- Advertisement -

अकोले तालुक्यात २१ नागरिक परदेशावरून आले आहेत तर ३५ जण हे महाराष्ट्राच्या विविध भागातुन अकोले तालुक्यात दाखल झाले आहे. या सर्वांवर आरोग्य विभागाची करडी नजर असून दिवसाआड त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात आरोग्य विभागाने तीन हजारावर लोकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ केल्याचा शिक्का मारला आहे. अजूनही जर कुणी बाहेरचा नागरिक गावात दाखल झाला तर त्याची माहिती गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला देणे बंधनकारक आहे. होम क्वारंटाईन असलेल्या लोकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात बेड आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. एकंदरीत अकोले तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा कोरोनावर करडी नजर ठेऊन आहे. मात्र या आणीबाणीच्या काळात प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -