घरमुंबईमुंबईत दोन महिन्यांत पावसाचे ४५ बळी

मुंबईत दोन महिन्यांत पावसाचे ४५ बळी

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत ६३ जण जखमी झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे नोंद झालेली आहे, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.

देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत ६३ जण जखमी झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे नोंद झालेली आहे, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे. मुंबईत दोन महिन्यात इतके मृत्यू होत असतील तर वर्षभरात किती मृत्यू होत असतील असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

पावसाळ्यात मुंबईत अनेक दुर्घटना घडतात. यात घर, पूल किंवा पुलाचा भाग पडणे, दरड कोसळणे, झाड किंवा झाडांच्या फांद्या पडणे, शॉर्ट सर्किट, वीज पडणे, समुद्र किंवा नाल्यात वाहून जाणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे. मुंबईत १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत घर, पूल किंवा पुलाचा भाग पडण्याच्या ३४६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात २८ जण जखमी झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. दरडी कोसळण्याच्या ९ घटना नोंद झाल्या आहेत. यात कोणीही जखमी झालेले नाही. झाड किंवा झाडाची फांदी पडण्याच्या १३४९ घटनांची नोंद झाली असून त्यात २१ जण जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किट आणि वीज पडण्याच्या ७३३ घटनांची नोंद झाली आहे. त्यात ४ जण जखमी झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. समुद्र आणि नाल्यात वाहून जाण्याच्या ४३ घटनांची नोंद झाली असून, त्यात १० जण जखमी झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत लेप्टोस्पायरेसिस या आजाराच्या १०२ घटनांची नोंद झाली असून त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन कार्यरत आहे. हा विभाग अलर्ट असावा असे अपेक्षित आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटना होणे आणि त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होणे योग्य नाही. यावरून पालिका प्रशासन कुठे तरी कमी पडत आहे. दुर्घटना झाल्यावर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा आधीच काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -