घरमुंबईशहरातील झाडे तोडण्यासाठी ५२ कोटींची तरतूद

शहरातील झाडे तोडण्यासाठी ५२ कोटींची तरतूद

Subscribe

वृक्ष प्राधिकरणाचे अंर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्पिय अंदाज पत्रक बनवण्यात आले असून आगामी वर्षांत प्राधिकरणासाठी ११२.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मृत आणि धोकादायक वृक्ष आणि फांद्या कापण्यासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर खासगी जमिनीवरील मृत तसेच धोकादायक झाडे तसेच त्यांच्या फांद्या कापण्यासाठी १.६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरणापुढे पटलावर ठेवण्यात आले असले तरी ते मंगळवारी सादर करण्यात आले नव्हते. त्यामुळे पुढील बैठकीत या अर्थसंकल्पिय अंदाजपत्रकावर निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

वृक्ष प्राधिकरणाचे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक २००७-०८ पासून तयार करण्यात येत आहे. २०२०-२०२१च्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये एकूण उत्पन्न ११२.०५ कोटी रुपये असून एकूण खर्च १११.८८ कोटी रुपये एवढा आहे. परंतु ३१ मार्चपर्यंत ३७५.६८ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहणार आहे. उद्यानातील वृक्षांच्या देखभालीचे काम महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत केले जाते. त्यामुळे या खर्चापोटी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात ३० कोटी रुपयांचे अंशदान करण्यात येणार आहे.

यामध्ये ३४.६५ कोटी रुपये वृक्ष उपकर आणि गुंतवणुकीच्या उत्पन्नापासून ६.५४ कोटी रुपये तर शुल्क व उपयोगकरता आकार यापासून ४.०९ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. नवीन वृक्षांच्या लागवडीसाठी ८२ लाख रुपये तर रोपवाटिकांच्या विकासासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर विविध डम्पिंग ग्राऊंडमध्ये वृक्षांची लागवड आणि नवीन वृक्षांची लागवड करण्यासाठी १ लाख ७६ हजारांची तर डम्पिंग ग्राऊंडवरील विद्यमान झाडांची देखभाल करण्यासाठी १ लाख ८३ हजार रुपयांची तर मुंबईतील एकूण झाडांची देखभाल करण्यासाठी ८९.६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -