घरलाईफस्टाईलपोटातील जंतावर घरगुती उपाय

पोटातील जंतावर घरगुती उपाय

Subscribe

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास जाणून घ्या काय करावे.

लहान मुलांमध्ये जंत, कृमी होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. सतत होणाऱ्या जंताच्या त्रासामुळे पोटदुखी, जुलाब होणे, भूक मंदावणे, असे त्रास उद्भवतात. मात्र, यावर काही घरगुती उपाय केल्यास जंताचा त्रास कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.

शेवग्याच्या शेंगा

- Advertisement -

एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्या व्यक्तीला जरी जंताचा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगाच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी तयार करताना शेवग्याच्या शेंगा पाण्यात उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ आणि मिर पूड टाकून ते पाणी घ्यावे यामुळे जंत कमी होतात.

- Advertisement -

वावडिंगाचे चूर्ण

दररोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासोबत घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो. तसेच महिन्यातून एकदा वावडिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने जंताचा त्रास कमी होतो.

ताकाचे सेवन

जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा आणि हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होण्यास मदत होते.

कारल्याची पाने

जंत पडण्याकरता कारल्याची पाने एक रामबाण उपाय आहे. कारल्याच्या पानांचा रस, मुळ्याचा रस आणि मध एकत्र करून घेतल्याने जंत पडण्यास मदत होते.

कडुनिंबाचे चूर्ण

कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण आणि हिंग यांचे मिश्रण मधासह घेतल्याने जंतांचा नाश होण्यास मदत होते.

डाळिंबाची साल

डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्‍या प्रमाणात घेतले तर जंताचे प्रमाण कमी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -