घरमुंबईपाच कोटी भारतीयांवर डिप्रेशनचा घाला !

पाच कोटी भारतीयांवर डिप्रेशनचा घाला !

Subscribe

आपल्या भक्तगणांना नेहमीच जीवनोपयोगी सल्ला देणारे आध्यात्मिक संत भय्यू महाराज यांनी मानसिक दबावाखाली आत्महत्या केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्व सुखे हात जोडून समोर उभी असताना माणूस आत्महत्येचा असा टोकाचा विचार का करतो, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. भारतातील पुरुषांच्या आत्महत्येचे मुख्य कारण डिप्रेशन असल्याचे त्यात आढळले आहे. भारतात सुमारे 5 कोटी लोक डिप्रेशनमुळे त्रस्त असून त्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीयांमध्ये डिप्रेशन कमालीचे वाढले आहे. सर्वाधिक डिप्रेशनचे रुग्ण असलेला भारत हा जगातील एक देश आहे. डिप्रेशनसोबतच भारतातील अनेक नागरीक आज सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा मानसिक रोगांनी त्रस्त आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे भारतात डिप्रेशनने त्रस्त असलेले लोक आपल्याला हा आजार आहे, हे मानायलाच तयार नाहीत. त्यामुळे डिप्रेशनवर ते कोणताही उपचार घेत नाहीत. वास्तविक कौन्सिलिंग हा डिप्रेशनवर सर्वात चांगला उपाय आहे. तरी तो टाळला जातो. त्याला प्रमुख कारण म्हणजे समाज काय म्हणेल? ही भीती असते. डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर म्हणजे वेडेपणा नाही. मात्र त्याला वेडेपणा समजला जातो. आपल्याला लोक वेडे म्हणतील, म्हणून त्यावरील इलाज टाळण्याकडे रुग्णाचा कल असतो.

अमेरिका ही सर्वाधिक डिप्रेशन असलेला देश आहे. तर जपान, नायजेरिया, चीन हे देश सर्वात कमी डिप्रेशन असलेले देश आहेत. भारत हा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक डिप्रेशन असलेल्या लोकांचा देश आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर मागील तीन वर्षांत संपूर्ण जगात डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये पाचपटीने वाढ झाली आहे.

- Advertisement -

डिप्रेशनचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार सातत्याने येत असतात. भारतात महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, त्या आत्महत्येपर्यंतचा टोकाचा विचार सहसा करत नाहीत. डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न अथवा आत्महत्या करणाèयांमध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून भारतात वाढले आहे.

डिप्रेशनची लक्षणे:

१) नेहमी निराश, दु:खद वाटणे
२) नेहमीच्या कामात स्वारस्य न राहणे
३) सतत दोन आठवडे नेहमीची कामे करणे सोडून देणे
४) मित्रमैत्रिणी, नातेवाइकांपासून लांब राहणे
५) शारीरीक, मानसिक ऊर्जा नष्ट होणे
६) भूक न लागणे किंवा अधिक भूक लागणे
७) जास्त अथवा कमी झोप घेणे
८) अस्वस्थता, सतत लक्ष विचलित होणे
९) निराशाजनक विचार मनात येणे
१० ) आत्महत्या करावीशी वाटणे

कौन्सिलिंग उत्तम इलाज

डिप्रेशनग्रस्त रुग्णांनी मनोसोपचार तज्ज्ञांकडून कौन्सिलिंग करून घेणे हा चांगला उपाय आहे. या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे, नियमित योग, व्यायाम करणे, आठवड्यातून एकदा तरी निसर्गाजवळ म्हणजे गावखेड्यात जाणे, अशा इलाजांमुळे डिप्रेशनपासून सुटका होऊ शकते, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -