घरमुंबई'ललित साळवे' घरी परतला

‘ललित साळवे’ घरी परतला

Subscribe

लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करुन नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ललित अखेर सज्ज झाला आहे. सेंज जॉर्ज हॉस्पिटलमधून मंगळवारी ललितला डिस्चार्ज मिळाला. ललिता साळवेचा ‘ललित साळवे’ झाल्यानंतर ललित बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातल्या राजेगावातील आपल्या घरी परतला. ललितचे गावात आगमन होताच कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. फटाके वाजवून ललितच्या गळ्यात हार, डोक्यावर टोपी आणि गळ्यात टॉवेल देत औक्षण करत त्याचे स्वागत करण्यात आले. ललित ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता त्याच्या आयुष्यात आल्याने त्याच्यासह कुटुंबिय खूप आनंदी झाले आहेत.

ललित होण्यासाठी केली लढाई

२९ वर्षाच्या ललित साळवे या पोलीस कॉन्स्टेबलने ललितापासून ललित होण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. पोलीस खात्यातील नोकरी आणि लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेसाठी तिने कठोर लढाईचा सामना केला. लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी तिने पोलीस खात्याकडे परवानगी मागितली होती. मात्र महिला असून पुरुष असल्याचा त्यांच्या या दाव्यामुळे त्यांना पोलीस खात्याने परवानगी नाकारली होती. गेल्या वर्षभरापासून ललिताचा लढा सुरु होता. अखेर तिच्या या लढ्याला यश आलं असून आता ललिताला ललित साळवे अशी ओळख मिळाली आहे.

- Advertisement -

गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

राजेगावातील गावकरी आपला मुलगा ललित येणार असल्याने आतुरतेने वाट पाहत होते. गावकऱ्यांनी ललितच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती. जवळपास राजेगावच्या १०० गावकऱ्यांनी ललिच्या घरासमोरील मैदानाची स्वच्छता केली. त्यानंतर त्यांच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. ललितच्या आवडीचे पदार्थ देखील तयार करण्यात आले होते. ललित येणार असल्याने संपूर्ण गावाने पहाटे ललित साळवेच्या घराबाहेर त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. ललितचेच गाववाले नाही तर त्याचे दूरचे नातेवाईक देखील त्याच्या स्वागतासाठी राजेगावात आले होते.

‘सर्वांच्या सहकार्यामुळे मला ओळख मिळाली’

ललित साळवेची ललिता झाल्यानंतर राजेगावच्या गावकऱ्यांनी ललितचा स्विकार केला. ललितदादा, ललितभाऊ, ललित बेटा असं म्हणत त्यांनी त्याचे स्वागत केलं. एखाद्या सेलिब्रिटीसारखे ललितचे गावकऱ्यांनी स्वागत केलं. गावातील सर्व तरुणांनी ललितच्या स्वागतासाठी कार सजवली होती तसंच त्याच्या आगमनावेळी जोरदार फटाके वाजवले. ललित देखील कुटुंबिय आणि गावकऱ्यांच्या या आनंदामुळे भारावून गेला. “तुमच्या सर्वाच्या प्रेम आणि जिव्हाळा मी कधीच विसरु शकणार नाही. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मला ही ओळख मिळाली” असल्याचे मत ललित साळवेने व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -