घरमुंबईओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या

ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या

Subscribe

एका ओला कार चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील मुंबई – नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पुलाखाली घडली आहे. याप्रकरणी रविवारी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला आहे.

प्रभाकर गंजी ( ४३ वर्ष, रा. कणेरी, भिवंडी ) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाचे नाव आहे. प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटुंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून कार चालक म्हणून कार्यरत होता. त्यातच ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मृतक प्रभाकरची कार मुबंई – नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती.

- Advertisement -

बराच वेळ झाला कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवर जागीच बसून होता. त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने काही स्थानिक नागरिकांना त्याचा संशय आला. त्यामुळे येथील कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी दिल्याने पोलिसांनी कारजवळ जाऊन पहिले तर प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर स्थानिक नारपोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रभाकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

मृत प्रभाकर याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली असून मारेकरी पकडल्यानंतरच प्रभाकरच्या हत्येचे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश वाघमारे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -