घरCORONA UPDATEBreak The Chain : मुंबईतील दुकाने रात्री १० पर्यंत तर रेस्टॉरंट, हॉटेल्स...

Break The Chain : मुंबईतील दुकाने रात्री १० पर्यंत तर रेस्टॉरंट, हॉटेल्स ४ वाजेपर्यंत खुले राहतील

Subscribe

मुंबईत सामान्यांना लोकलची प्रतिक्षाच

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोविड -१९ चा सकारात्मक सरासरी दर हा १.७६% वर आला आहे तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर १८.९७% इतका आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाल्याने व कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबई शहर व उपनगरात कोरोनाबाबत घालण्यात आलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिराने जाहीर केला आहे. या संदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

त्यानुसार, सामान्य व्यक्तींना लोकल ट्रेनचा प्रवास बंदच असणार आहे. मात्र कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून मुंबईतील दुकाने यापुढे आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर रेस्टॉरंट व हॉटेल्स यांनाही आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला या निर्णयामुळे व हॉटेल, रेस्टॉरंट चालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच, औषध विक्रेत्यांना मेडिकल २४ तास खुले ठेवण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

स्विमिंग पूल, इनडोअर, आउटडोअर खेळांना परवानगी

खेळांना परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने मुंबई महापालिकेने अधिक काळजी घेतली आहे. मुंबईतील स्विमिंग पूल, अगदी जवळचा संपर्क येऊ शकणाऱ्या खेळांचे प्रकार वगळता अन्य आऊटडोअर व इनडोअर खेळांना नियमित वेळेनुसार खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चित्रीकरणाला परवानगी

कोरोनामुळे चित्रपट उद्योग डबघाईला आला आहे. त्यामुळे नियमांचे बंधन घालून चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्या मागणीचा विचार करून चित्रीकरणाला नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -