घरमुंबई१५ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून काढली दीड किलोची गाठ

१५ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून काढली दीड किलोची गाठ

Subscribe

ट्युमरचे वजन १.५ किलो असून, १६ सेंटीमीटर इतक मोठा आहे. या शस्त्रक्रियेमुळे मुलाला नव्याने जीवदान मिळाले आहे.

भायखळा येथील प्रतीक बरकडे (वय १५) या मुलाच्या फुफ्फुसातून फुटबॉलच्या आकाराइतकी मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या ट्युमरचे वजन १.५ किलो असून, १६ सेंटीमीटर इतक मोठा आहे. या शस्त्रक्रियेमुळे मुलाला नव्याने जीवदान मिळाले आहे.

भायखळ्यातील प्रतीक बरकडे याला अचानक छातीत दुखणे, दम लागणे, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. ही कोविड-१९ ची लक्षणे असल्याने कुटुंबियांना त्याला वोक्हार्ट रूग्णालय उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्याच्या छातीचा सीटीस्कॅन केला असता त्याच्या फुफ्फुसात गाठ असल्याचे निदान झाले. हा ट्युमर प्रतीकच्या उजव्या छातीच्या पोकळीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर तो काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांना सांगितले. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. फुफ्फुसात आढळून येणारे हे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणार्‍या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय आहे. या गाठीला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर असे म्हणतात.

- Advertisement -

आमच्या मुलाला श्वास आणि खोकला येत होता. त्यामागील कारण आम्हाला समजू शकले नाही. कोविड-१९ च्या भितीपायी आम्ही रूग्णालयात येणे टाळत होतो. फुफ्फुसात ट्यमूर असल्याचे ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच निदान व शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहे. आता प्रतिकच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू लागला असल्याचे प्रतीकचे वडिल मयूर बरकडे यांनी सांगितले.

प्रतिकवर वेळेवर उपचार न झाल्याने त्याच्या वयाबरोबर ट्यूमर वाढत होता. हा ट्यूमर फुटबॉलच्या आकारा इतका मोठा झाला होता. या गाठीमुळे फुफ्फुसे, श्वसन नलिका व हदय यावर विपरित परिणाम होऊ लागला होता. यासाठी शस्त्रक्रिया करणे फार गरजेचे होते.
– डॉ. उपेंद्र भालेराव, कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन, वोक्हार्ट रूग्णालय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -