घरमुंबईमुंबईकरांसाठी चिंतेंची बाब; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के साठा, पाणीकपातीची शक्यता

मुंबईकरांसाठी चिंतेंची बाब; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के साठा, पाणीकपातीची शक्यता

Subscribe

मुंबई : जून महिना संपत आला तरी अजून पावसाला सुरूवात झालेली नाही. त्यात आता मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तलावात केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. (A matter of concern for Mumbaikars Only 7 percent storage in water supply dams potential for water cuts)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त 6.92 टक्के पाणीसाठा उरला आहे, तर राखीव पाणीसाठा मिळून मुंबईसाठी फक्त 12.73 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस मुंबईतील धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी कपाती संदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळसी या धरणांमध्ये 6.92 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Monsoon Update : विदर्भात हजेरी; मुंबई, पुणेकरांना मान्सूनची आणखी प्रतीक्षा

40 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे वर्षभरासाठी मुंबईतील तलावात 14 लाख 47हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असतो. परंतु यंदा मुंबईला सात धरणातून होणारा पाणीपुरवठा आणि मुंबई महापालिकेला राज्य सरकारच्या राखीव पाणी साठ्यातील (भातसा धरण) शिल्लक पाणीसाठा विचारात घेतला तर केवळ 12.73 टक्के पाणीसाठा सध्या मुंबईकरांसाठी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा करताना या पाणीसाठ्यातील एक टक्के पाणीसाठा हा तीन दिवस पुरणार आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा हा 40 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने उघडले सरपंचपदाचे खाते; महिलेची बिनविरोध निवड

शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो 

मान्सून यंदा उशिरा येणार असल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही पाणी कपात होऊ शकते. त्यात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीणच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असातना आता शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -