घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात बीआरएस पक्षाने उघडले सरपंचपदाचे खाते; महिलेची बिनविरोध निवड

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने उघडले सरपंचपदाचे खाते; महिलेची बिनविरोध निवड

Subscribe

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष आपली पकड मजबूत करताना दिसत आहे. बीआरएस पक्षाने गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावात ग्रामपंचायतीवर पहिला सरपंच बिनविरोध निवडून आला आहे. (BRS party opens Sarpanchpad account in Maharashtra; Uncontested choice of woman)

बीआरएस पक्षाच्या सुषमा विष्णू मुळे (Sushma Vishnu Mule) यांची आज सावखेडा ग्रामपंचायतीवर सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar rao), माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आज सावखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे यांचे सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Patna meeting : लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

सुषमा विष्णू मुळे यांच्या रूपाने भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्र राज्याच्या प्रथम सरपंच निवडून येऊन भारत राष्ट्र समिती पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत असून आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत बीआरएस चमकदार कामगिरी करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील बी आर एस पक्षाचा पहिला सरपंच असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली. या निवडीबद्दल महाराष्ट्रभरातून भारत राष्ट्र समितीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी युवा नेते संतोष माने यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

- Advertisement -

हेही वाचा – Mhada Lottery 2023 : ‘म्हाडा’ मुंबई मंडळाला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ?; प्रस्ताव उपाध्यक्षांकडे

बीआरएसचा महाराष्ट्रात पायेमुळे रोवण्याचा प्रयत्न

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रशेखरराव हेही आघाडीवर होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखरराव यांनी त्यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात पायेमुळे रोवण्यासाठी ते सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला प्रतिसादही मिळत आहे. बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना. तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखरराव हे सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण चंद्रशेखरराव यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो की नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -