घरमुंबईआदित्य ठाकरेंना आमंत्रित केल्याने झेवियर्समध्ये वाद

आदित्य ठाकरेंना आमंत्रित केल्याने झेवियर्समध्ये वाद

Subscribe

गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते. याविषयी त्यांना विचारले असता आपल्याविरोधातील सह्यांच्या मोहिमेबद्दल आपल्याला कल्पना नाही. यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणार्‍या सेंट झेवियर्स कॉलेज यंदा आपले १५० वर्षे साजरे करीत आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रित केल्याने वादाची नवी ठिणगी पडली आहे. आदित्य ठाकरे यांना अनेक माजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. याविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली असल्याचे समोर आले आहे.

मुंबई विद्यापीठाने २०१०मध्ये रोहिंगटन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश केला त्यावेळेस युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आंदोलन केले होते. यानंतर ते पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्यात आले होते. यावेळेस ते सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेत होते. कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य फादर फ्रेजर मास्कहेनान्स यांनी ठाकरे यांच्या या आंदोलनाला तीव्र विरोध केला होता.

- Advertisement -

अशी पार्श्वभूमी ठाकरे यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल काही माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या वादावर कॉलेज प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. १५० व्या वर्षानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यवसाय, त्यांची विचारसरणी सर्व बाजूला सारून एकत्र यावे. कॉलेजचा २०५० पर्यंतचा विकास आराखडा तयार करावा, हाच आमचा उद्देश आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कॉलेजचा एकात्मिक विकास साधावा, असेही कॉलेजने यानिमित्ताने स्पष्ट केले.

१५० वर्षांनिमित्त विशेष कार्यक्रम

झेविअर्स कॉलेज पुढील वर्षी १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कॉलेजचा सर्वांगीण विकास करत कॉलेजचे वैभव कायम ठेवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून गुरुवारी १५० व्या वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला शायना एन.सी, अनु आगा, डॉ. स्वाती पिरामल, अमृता रायचंद, आशीष बसीन, आदित्य ठाकरे आदी कॉलेजचे नामांकित माजी विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

दीड वर्ष कार्यक्रमांची रेलचेल

१५०व्या जयंती वर्षानिमित्त दीड वर्ष विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी लोगोचे अनावरण करून झाली. यानंतर २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत हिंदी, मराठी व इंग्रजी नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ३ जानेवारी २०१९ रोजी या महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. जगभरातून कॉलेजचे सुमारे २००० माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यानंतर प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या महोत्सवाची ३ जानेवरी २०२० रोजी सांगता केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -