घरमुंबईपरिचारिकांचे लैंगिक शोषण करणार्‍या डॉक्टरांवर होणार गुन्हा दाखल

परिचारिकांचे लैंगिक शोषण करणार्‍या डॉक्टरांवर होणार गुन्हा दाखल

Subscribe

महापौर महाडेश्वरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई:मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयातील परिचारिका आणि महिला रुग्णांचा लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार कर्मचार्‍यांनी महापौरांकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत परिचारिका व रुग्णांचे लैंगिक शोषण करणार्‍या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा, अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला केल्या.

शिवडी येथे मुंबई महापालिकेचे टीबी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील टीबी रुग्ण असलेल्या लहान मुलांना त्यांच्या नातेवाइकांसह हकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला होता. याविरोधात रुग्णांच्या नातेवाइकांनी माहिम दर्ग्याजवळ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली होती. यावेळी रुग्णालयात परिचारिका आणि रुग्णांचा छळ केला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी टीबी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळीही परिचारिकांकडून रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने शुभदा परब, प्रीती सातवसे, रुपाली पवार या परिचारिका तर अंगुरी वाल्मिकी यांना निलंबित करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या निलंबनाविरोधात परिचारिकांनी शिवसेनेच्या कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली रुग्णालयात व पालिका मुख्यालयात निदर्शने केली. यावेळी महापौरांची भेट घेण्यात आली. त्यावेळी परिचारिकांनी आपल्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. डॉक्टर ललित आनंदे, डॉ. अमर पवार व हमाल पदावर कार्यरत असताना सर्वांना डॉक्टर असल्याचे भासवणारा मकवाना कशा प्रकारे महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ करतात याचा पाढा वाचला. डॉक्टर कशा प्रकारे रुग्ण असलेल्या लहान मुलींचा लैंगिक छळ करण्यासाठी घेऊन जातात याची छायाचित्रे महापौरांना दाखवण्यात आली.

- Advertisement -

महिला नर्सेसवर अन्याय करणे, उपचार घेत असलेल्या लहान मुलींना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणे, महिला परिचारिकांना सतावणे, कर्मचार्‍यांच्या विरोधात डॉक्टरांनी नातेवाइकांना भडकावणे हे प्रकार गंभीर आहेत. याची चौकशी करण्यात यावी. टीबीसारखा आजार वाढत असताना त्या रुग्णांना परिचारकांकडून चांगली सेवा दिली जात आहे. 21 व्या शतकात महिलांचे शोषण होणे योग्य नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. डॉक्टरांनी महिलांचा छळ केला असल्यास डॉक्टरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी परिचारिका दोषी असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उपायुक्त सुनील धामणे यांना केल्या.

परिचारीकांच्या संपाचा रुग्णांना फटका

शिवडी टीबी रुग्णालयातील नर्सनी गुरुवारी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा 05 फटका बसला. पालिका प्रशासनाने चार नर्सवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ नर्सनी संप पुकारला. अचानक सुरू झालेल्या या संपामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. रुग्णांना योग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी शिवडी टीबी रुग्णालयातील चार नर्सवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. या कारवाईत चार नर्सना निलंबित करण्यात आले होते. पालिकेच्या या निर्णयाविरोधात रुग्णालयातील नर्सनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -