घरमुंबईअकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या यादीत ७६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या यादीत ७६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Subscribe

अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून ७६ हजार २३१विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. २० हजार ३७१ विद्यार्थ्याना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून विद्यार्थ्यांना ९ डिसेंबरपर्यंत आपली प्रवेशनिश्चिती जागा अलॉट झालेल्या महाविद्यालयात करायची आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिल्यामुळे रखडलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अखेर सुरु झाली. ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून ७६ हजार २३१विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. २० हजार ३७१ विद्यार्थ्याना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून विद्यार्थ्यांना ९ डिसेंबरपर्यंत आपली प्रवेशनिश्चिती जागा अलॉट झालेल्या महाविद्यालयात करायची आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयाला विलंब होत असल्याने राज्य सरकारने एसईबीसी आरक्षण स्थगित करत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. त्यामुळे अनेक दिवस रखडलेली अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. एसईबीसी आरक्षणाला स्थागिती देताना या प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार शनिवारी दूसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. दुसर्‍या गुणवत्ता यादीमध्ये १ लाख ४७ हजार ३३ जागा असून, त्यासाठी १ लाख ५८ हजार ८१० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ७६ हजार २६१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यामध्ये कला शाखेच्या ७४३३, वाणिज्य शाखेचे ४६ हजार ६००, विज्ञान शाखेचे २१ हजार ५८८ आणि एमसीव्हीसीच्या ६१० विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये एसएससी मंडळाचे सर्वाधिक ७० हजार ५३७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्याखालोखाल आयसीएसई २५७२, सीबीएसई २१४२, एनआयओएस ३६३, आयजीसीएसई २३४ विद्यार्थ्यांची निवड झाली.

- Advertisement -

खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या १ लाख ३० हजार ४८९ विद्यार्थ्यांमधून ५८ हजार ५४७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ओबीसीच्या ११ हजार ४७२ पैकी ७३२३, एससीच्या १२ हजार १२७ पैकी ६९७४ विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच ईडब्ल्यूएसच्या ७९ पैकी ७४ विद्यार्थ्यांची निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -