घरताज्या घडामोडीलग्नाच्या ५ दिवसांनंतर आदित्यने बायकोला माहेरी पाठवण्याची दिली धमकी!

लग्नाच्या ५ दिवसांनंतर आदित्यने बायकोला माहेरी पाठवण्याची दिली धमकी!

Subscribe

आदित्य बायको धमकी देताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बॉलिवूड लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण हा श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि श्वेता याचा लग्न समारंभ १ डिसेंबर पार पडला. कोरोना काळ असल्यामुळे याच्या लग्नात जास्ता लोकांनी उपस्थितीत लावली नाही. लग्नानंतर आदित्य आणि श्वेताने एक रिसेप्शन पार्टी ठेवली होती. रिसेप्शन पार्टीमध्ये देखील ५० पाहुणे आले होते. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. रिसेप्शन पार्टीत गोविंदा पासून भारती सिंहपर्यंत अनेक जण डान्स आणि मस्ती करताना दिसले होते. दरम्यान आदित्य आणि श्वेताच्या लग्नानंतर एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आदित्य आपली पत्नी श्वेताला माहेरी पाठवण्याची धमकी देताना दिसत आहेत. आदित्य श्वेताला असे म्हणताना दिसत आहे की, ‘चवीत काही गडबड व्हायला नाही पाहिजे, नाहीतर तुला माहेरी पाठवणे.’ आदित्य या व्हिडिओ चुकून माहेरी बोलायच सोडून सासरी पाठवणे म्हणतो. पण नंतर तो आपली चुक सुधारतो. त्यामुळे त्याच्यावर सगळेजण हसताना दिसत आहे.

- Advertisement -

आता लग्नानंतर आदित्य आणि श्वेता हनिमूनाला जाण्याची तयारी करत आहे. आदित्य नारायणने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या हनिमून संदर्भात सांगितले की, ‘आम्ही एक नाही, दोन नाही, तर तीन ठिकाणी हनिमून करण्यासाठी जाणार आहोत. शिमला, सुला वाइनयार्ड्स, गुलमर्गला हनिमूनसाठी जाणार आहेत.’


हेही वाचा – Bigg Boss 14: दोन मराठमोळे सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -