घरमुंबईMumbai Public School मध्ये मिळणार स्वस्तात दर्जेदार शिक्षण; वर्षाच्या सुरुवातीलाच झाली अर्ज...

Mumbai Public School मध्ये मिळणार स्वस्तात दर्जेदार शिक्षण; वर्षाच्या सुरुवातीलाच झाली अर्ज प्रक्रिया सुरू

Subscribe

मुंबई : मुलांना केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये शिकवायचे असते, पण फी परवडत नाही. अशावेळी करायचे काय? असा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. मात्र गेल्या काही वर्षात पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी शिक्षण मंडळ संलग्नित शाळांमधील सात हजाराहून अधिक जागांवर 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांकरिता 1 जानेवारीपासून अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. (Affordable quality education in Mumbai Public School The application process started at the beginning of the year)

महापालिकेच्या यंदा पाच नवीन सीबीएसई शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे यंदा महापालिकेच्या शाळांची संख्या 22 झाली आहे. एकूण 22 शाळांपैकी आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई यांची संख्या 1 असून उर्वरित सीबीएसईच्या शाळा आहेत. सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या 40 आहे, तर आयजीएसई व आयबीची पटसंख्या 30 आहे. एकूण जागांपैकी महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या 10 टक्के व मनपा कर्मचाऱ्यांकरिता 5 टक्के जागा राखीव आहे. तसेच या सर्व जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – INDIA आघाडीचे संयोजक कोण? नितीशकुमारांच्या नावाची पुन्हा चर्चा; JDU नेत्यांनी लावून धरली बाजू

महापालिकेच्या शाळांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 1 ते 15 जानेवारी एवढी वेळ देण्यात आली असून 10 ते 22 जानेवारी दरम्यान, ऑनलाइन अर्ज केलेल्या कागदपत्रांची छाननी व समुपदेशन होणार आहे. तसेच सोडतीसाठी विद्यार्थ्यांची यादी 27 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मुख्य सोडत प्रसिद्ध होणार आहे. यानंतर निवड झालेल्या पाल्यांची प्रवेश नोंद 29 फेब्रुवारीपर्यंत गरजेचे आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल 2024 रोजी शैक्षणि सत्राची सुरुवात होईल.

- Advertisement -

ऑनलाइन अर्जाकरीता पालकांच्या मदतीसाठी कक्ष

सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी शिक्षण मंडळ संलग्नित शाळांमध्ये केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या पालकांकडे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही, अशा पालकांसाठी संबंधित पब्लिक स्कूलमध्ये मदत कक्ष स्थापन्यात आले आहेत. 1 ते 15 जानेवारी दरम्यान सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत सोमवार ते शनिवार मदत कक्षांवर पालकांना मदत करण्यास कर्मचारी उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना असतानाही Shaheen Afridi ला पाकिस्तान संघातून वगळले; कारण काय?

‘या’ ठिकाणी असतील मदतकक्ष 

ऑनलाइन अर्जाकरीता चिकूवाडी (बोरीवली), जनकल्याण नगर (मालाड), प्रतीक्षा नगर (जोगेश्वरी), मीठागर (मुलुंड), हरियाली विलेज (विक्रोळी), राजावाडी (घाटकोपर), अजिज बाग (चेंबूर), तुंगा विलेज (पवई), भवानी शंकर रोड (दादर), काणे नगर (सायन), पूनम नगर (अंधेरी (पू), वूलन मिल (माहीम), एल के. वाघजी (माटुंगा), विलेपार्ले (पू), जिजामाता नगर, आशिष तलाव (वडवली), एम.जी.क्रॉस रोड क्र. 1, बोरा बझार, शांती नगर, नटवरलाल पारेख कंपाऊंड, मालवणी टाऊनशिप (मालाड), वीर सावरकर मार्ग (वर्षा नगर) या ठिकाणी पालकांकरिता मदतकक्ष असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -