घरक्राइमCrime In Nagpur : सोनं लंपास करणारी कुख्यात 'गुलाबी गॅंग' अटकेत; सराफांनी...

Crime In Nagpur : सोनं लंपास करणारी कुख्यात ‘गुलाबी गॅंग’ अटकेत; सराफांनी सोडला सुटकेचा निश्वास

Subscribe

झटपट पैसे कमाविण्यासाठी एक ना अनेक फंडे गुन्हेगारी मानसिकता असलेले या ना त्या कारणाने पैसे कमाविण्याचा मार्ग शोधत असतात. असे असतानाच पुरुषांसोबतच काही महिलाही चोरी सारख्या गुन्ह्यात उतरल्याचे दिसून येत आहे. अशातच नागपुरात मागील काही वर्षांपासून चोरी करून धूमाकूळ घालणारी गुलाबी गॅंग सक्रीय होती

नागपूर : उपराजधानी नागपुरात काही महिन्यांपासून सराफा व्यावसायिकांच्या नाकात दम आणणाऱ्या गुलाबी गॅंगला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेत असलेल्या गुलाबी गॅंगमधील सर्वच्या सर्व आरोपी या महिला आहेत हे विशेष. (Crime In Nagpur Notorious gold looting Gulabi Gang arrested The goldsmiths breathed a sigh of relief)

झटपट पैसे कमाविण्यासाठी एक ना अनेक फंडे गुन्हेगारी मानसिकता असलेले या ना त्या कारणाने पैसे कमाविण्याचा मार्ग शोधत असतात. असे असतानाच पुरुषांसोबतच काही महिलाही चोरी सारख्या गुन्ह्यात उतरल्याचे दिसून येत आहे. अशातच नागपुरात मागील काही वर्षांपासून चोरी करून धूमाकूळ घालणारी गुलाबी गॅंग सक्रीय होती. या गुलाबी गॅंगमधील महिला या ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत तिथे टप्प्या-टप्‍प्यांने सोने आणि चांदीची चोरी करत होत्या. यामध्ये महिला आणि मुलींचा समावेश आहे. मात्र तहसील पोलिसांनी या गुलाबी गँगचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून 1 हजार 450 ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी असा 94 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला असून चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. अद्यापही दोन महिला आरोपी फरार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Manoj Jarange Patil आणि कुटुंबाचीच कुणबी नोंद नाही; राज्य सरकारवर साधला निशाणा

या महिला आरोपी अटकेत

अस्मिता उर्फ स्वाती प्रकाश लुटे, प्रिया प्रणव राऊत, पूजा राजाराम भनारकर, कल्याणी मनोज खडतकर अशी अटकेतील महिला व युवतींची नावे आहेत. भाग्यश्री पवन इंधनकर, मनीषा ओमप्रकाश मोहुर्ले या महिला आरोपी अद्याप फरार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray आणि Raju Shetti यांच्या भेटीमुळे कोल्हापूरातील ‘हा’ नेता नाराज

अशी झाली गुलाबी गॅंग तयार

गुलाबी गॅंग ही एका दिवसात तयार झाली नाही. या टोळीतील महिला आधीपासून एकमेकींच्या परिचायतीलही नव्हत्या. या दरम्यान अस्मिता ऊर्फ स्वाती ही गेल्या काही वर्षांपासून तहसील येथील चिमुरकर ज्वेलर्समध्ये काम करत होती. ती पूर्वी सोन्या-चांदीच्या दागिण्यांची विक्री ते बिलिंग करण्यापर्यंतची सर्व कामे करायची, त्यानंतर मनीषा तिथे कामाला लागली. तीही जवळपास हीच कामे करायची. त्यानंतर प्रिया, कल्याणी, पूनम आणि भाग्यश्री याही येथे सेल्सगर्ल म्हणून रुजू झाल्या. या सर्वांवर मालकांचा विश्‍वास बसल्यानंतर त्या दुकानातील सोने आणि चांदीच्या वस्तू थोड्या-थोड्या प्रमाणात काढून चोरी करत असत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -