घरमुंबईमहिला लोकलपुढे आल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

महिला लोकलपुढे आल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Subscribe

एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. मंगळवारी रेल्वेच्या विद्युत ओव्हरहेड वायरवर कपडा अडकल्याने ट्रान्सहार्बर मार्गावर रेल्वे सेवा १५ मिनटे ठप्प झाली होती. तर बुधवारी एक महिला रेल्वे लोकलला आडवी आल्याने कल्याणकडे जाणाऱ्या स्लो लोकलचे वेळापत्रक कोलमडले. २० ते २५ मिनीटानंतर ठाणे रेल्वे स्थानकावर थांबलेली लोकल कल्याणकडे रवाना झाली.

बुधवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कल्याण लोकलपुढे एक महिला आल्याने ठाणे स्थानकावर कल्याणकडे जाणारी लोकल जवळपास २० ते २५ मिनटे उभी राहिली. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या लोकलचा चक्क जॅम झाला. याचा त्रास प्रवाशांना पुन्हा सोसावा लागला. एक महिला ही लोकलसमोर आल्यानंतर घटनास्थळी आरपीएफ पोलिसांनी तिला बाहेर काढले. सुदैवाने ती बचावली. बेशुद्ध अवस्थेतील त्या महिलेला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिची ओळख पटलेली नाही. तसेच महिला लोकलसमोर कशी आली. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की अपघात घडला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -