घरमुंबईGoodNews! मुंबईकरांचे पाणी संकट टळले; तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा धरण ओव्हरफ्लो

GoodNews! मुंबईकरांचे पाणी संकट टळले; तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा धरण ओव्हरफ्लो

Subscribe

शहापुर तालुक्यातील  मुबंईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शुक्रवारी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर ने धरणाचे उघडण्यात आले असून ६९ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे  धरण देखील तुडुंब भरले आहे.

शुक्रवारी ठिक दुपारी १.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ ,३ ,५ हे तीन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.

- Advertisement -

मुंबईची तहान भागवणारे भातसा धरण तुंडूंब भरले | Bhatsa Dam overflow opened three doors

शहापूर तालुक्यातील मुबंईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शुक्रवारी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून ६९ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरणदेखील तुडूंब भरले आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, August 21, 2020

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची भातसावर महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६.१० दशलक्ष घनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे. भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते. शुक्रवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूजन करण्यात आले यावेळी आमदार दौलत दरोडा भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील उपविभागीयअभियंता मनोज पाण्डे आदी उपस्थित होते.


Corona साठी आख्ख्या जगाला मास्क घालून चीन होतंय मास्क फ्री!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -