घरटेक-वेकPOCO 120Hz डिस्प्लेचा स्मार्टफोन घेऊन येणार आणि OnePlus Nord देणार टक्कर!

POCO 120Hz डिस्प्लेचा स्मार्टफोन घेऊन येणार आणि OnePlus Nord देणार टक्कर!

Subscribe

पीओसीओ ग्लोबल (POCO Global)ने आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून टिझर शेअर करून आपल्या आगामी स्मार्टफोनबद्दल हिंट दिली आहे. टीझरनुसार कंपनीचा आगामी स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord)ला टक्कर देईल. अद्याप या आगामी स्मार्टफोनचे नाव समोर आले नाही आहे. पण कंपनीने शेअर केलेल्या टीझरवर या स्मार्टफोनचे स्क्रीम रेझोल्यूशनविषय काही गोष्टी समोर आल्या आहेत. यावरून असे म्हटले जात आहे की, ‘पीओसीओच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट एमोलेड (AMOLED) डिस्प्ले दिला जाऊ शकतो.’ याचा वापर वनप्लस नॉर्डमध्ये केला गेला आहे.

पीओसीओ ग्लोबलचे मार्केटींग मॅनेजर अँगस के हो एनजी (Angus Kai Ho Ng) एक पोस्ट शेअर करत सांगितले की, पीओसीओचा नवीन स्मार्टफोन हाय स्क्रीन रिफ्रेश रेट सोबत येईल. जरी याबाबत काही जाहीर केले नसेल तर अंदाज लावला जात आहे की, कंपनी यावेळी 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह स्मार्टफोन लाँच करेल. कारण यापूर्वी लाँच झालेल्या पीओसीओ एफ २ प्रो (POCO F2 Pro) स्मार्टफोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत कंपनी नवीन फोनमध्ये 90Hz किंवा 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेचा वापर करेल. परंतु यापूर्वी कंपनीने हिंट दिली आहे की, आगामी स्मार्टफोन वनप्लस नॉर्टला टक्कर देईल. त्यामुळे असे अंदाज दृढ होतो की, कंपनीचा नवीन स्मार्टफोनला 120Hz डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

कंपनीने अद्याप नवीन स्मार्टफोनचे नाव किंवा फिचर्सबाब कोणतीही गोष्ट उघड केली नाही. परंतु अलीकडेच एक पीओसीओ स्मार्टफोन EEC प्रमाणपत्र वेबसाईटवर मॉडेल नंबर M2007J20CG म्हणून लिस्ट केला गेला. जिथे अशी माहिती देण्यात आली की पीओसीओच्या आगामी स्मार्टफोनला 120Hz एएमओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो आणि हा स्मार्टफोन क्वालकॉम चिपसेटवर दिला जाईल. यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 64MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअप सारखी फिचर्स असू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – 7,000mAh बॅटरीसह लाँच होणार Samsung Galaxy M51


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -