घरमुंबईसंपूर्ण पोलीस स्टेशनच क्वारंटाईन

संपूर्ण पोलीस स्टेशनच क्वारंटाईन

Subscribe

एकूण 26 पोलीस करोनाबाधित

जे. जे. पोलीस ठाण्यातील अन्य तेरा पेालिसांना कोरोना झाल्याचे उघडकीस येताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. या तेरा पोलिसांमुळे जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 26 झाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. यापूर्वी 54 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते, आता तेरा पोलिसांचे करोना पॉझिटिव्ह आल्याने इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यालाच क्वारंटाईन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

अलीकडेच जे. जे मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्याच्या काही पोलिसांचे करोना टेस्ट करण्यात आले होते, त्यात काहींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस येताच त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, यापूर्वी डोंगरी पोलीस ठाण्याच्या आठहून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या बारा पोलिसांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते, त्यात प्रत्येकी सहा अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश होता. या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 54 पोलिसांना नंतर क्वारंटाईन करण्यात आले होते.

- Advertisement -

संबंधित पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पोलीस ठाण्यातील इतर तेरा पोलिसांना करोना झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यात सहा पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या तेरा पोलिसांमुळे आता जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या 26 झाली आहे. या सर्वांना सेव्हन हिलसह इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात इतर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आल्याने त्यांची यादी काढण्याचे काम सुरु आहे.

ही यादी काढल्यानंतर त्यांनाही लवकरच क्वारंटाईन करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतर काही पोलिसांचे रिपोर्ट नेगीटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांवरील पोलिसांना घरी राहण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असताना आता 26 पोलिसांना कोरोना झाला तर काही पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. करोनामुळे आता संपूर्ण पोलीस ठाणेच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -