घरमुंबईअंबरनाथ प्लॅस्टिक विरोधी कारवाई; ९०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त

अंबरनाथ प्लॅस्टिक विरोधी कारवाई; ९०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त

Subscribe

अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या पथकाने प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली.

प्लास्टिक बंदी केली असताना देखील बरनाथमध्ये काही दुकानादार, फेरीवाले मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॅगचा वापर करीत आहेत. या दुकानदार आणि फेरीवाल्यांना प्लास्टिक बॅग पुरविणारा टेम्पो काल नगरपालिका पथकाने पकडला. या टेम्पोमधून ९०० किलो प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून दंडवसुली केली आहे.

अशी केली कारवाई

प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य भरात लागू होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, शासन तसेच स्थानिक नगरपालिकांकडून प्लास्टिक न वापरण्याबाबत एकीकडे जनजागृती तसेच नगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्लास्टिक वापरणारे फेरीवाले, होलसेलर्स आणि व्यापा-यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. तरी प्लास्टिकच्या पूर्णपणे वापरावर बंदी आणण्यात या यंत्रणांना यश आले नाही. अंबरनाथ येथून एका टेम्पोत ९०० कीलो प्लास्टिकचा साठा नेण्यात येत होता. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली असता त्यांच्या पथकाने या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये ९०० किलो प्लास्टिकचा साठा आढळला.

- Advertisement -

बंदी असूनही प्लास्टिकचा वापर सुरु

नगरपालिका पथकाने या टेम्पोतील सर्व प्लास्टिकचा साठा जप्त करत त्याच्याकडून दंड वसुल केला. नगरपालिकेने गेल्या नऊ महिन्यात प्लास्टिक बंदीबाबत राबवलेल्या मोहिमेतील कारवाईत ५ लाख ४० हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करत असली तरी, या कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाले तसेच व्यापा-यांमध्ये या कारवाईबाबत भिती नाही. गेल्या काही काळात प्लास्टिक बंदी विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई थंडावल्याचे समोर येत आहे. त्यामुळे किरकोळ व्यापा-यांहून प्लास्टिकचा पुरवठा करणा-या होलसेलर्सकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची विक्री केली जात आहे. मात्र यांच्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप प्रामाणिकपणे प्लास्टिक न वापरणा-या व्यापा-यांकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -